महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शाळांना सुटी...विद्यार्थी मैदानांवर

11:21 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भर पावसातही लुटला खेळांचा आनंद

Advertisement

बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस झाल्यामुळे सोमवारी व मंगळवारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. शाळेला सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी पावसामध्ये क्रिकेट तसेच इतर खेळ खेळण्याचा आनंद लुटला. शहरासह ग्रामीण भागात पावसामध्ये खेळणारे विद्यार्थी दिसून येत होते. पावसाचे पाणी वाढल्याने धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहरासह तालुक्यात अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली. खानापूर तालुक्यातील शाळांसह पीयू कॉलेजनाही सुटी देण्यात आली. यामुळे आठवड्याचा पहिला दिवस असतानाही सोमवारी शाळांची घंटा वाजली नाही. सोमवारी दुपारपर्यंत शहरात तुरळक पाऊस होता. त्यामुळे सरदार्स मैदान तसेच शहरातील छोट्या-छोट्या मैदानांवर शाळकरी विद्यार्थी क्रिकेट खेळण्यात दंग असल्याचे दिसून आले. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढल्याने मैदानांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. शाळांना सुटी असल्याने रिक्षामामांनीही उसंत घेतली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article