एचएमपीव्ही व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव
मुंबई
चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसच्या संसर्गामुळे उद्रेक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही या व्हायरसचे तीन रुग्ण सापडले आहेत. अशातच आता महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचा शिरकाव झाला आहे. नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे दोन संयशीत रुग्ण सापडले आहेत. येथील दोन मुलांना (वय ७ आणि १४) यांना या विषाणूची लागण झाली आहे. लक्षण आढळल्यानंतर या दोन्ही मुलांची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.
नागपूरमधील रुग्णांबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलांना खोकला होता आणि तापाची लक्षणे दिसत होती. यादरम्यान या दोन्ही मुलांची टेस्ट केल्यानंतर दोघांचाही तपासणी अहवाल पॉझिटीव्हा आला. दोन्ही रुग्णांमध्ये सामन्य लक्षणे दिसत असल्याने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. यांच्यावर योग्य औषधोपचार देऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णांना ३ जानेवारीलाच झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.