कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एचएमडी, हुक्केरी स्टार, साईराज वॉरियर्स, बालाजी स्पोर्ट्स विजयी

10:54 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉ. सतीश जारकीहोळी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : वाल्मिकी जिल्हा समाज व भातकांडे स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी कर्नाटक राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एचएमडी स्पोर्ट्सने विजय तळवार संघाचा, हुक्केरी स्टारने डेपो मास्टर्सचा, साईराज वॉरियर्सने प्रशांत नाईक वॉरियर्सचा तर बालाजी स्पोर्ट्सने अल-फता स्पोर्ट्सचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. संतोष जाधव, चंदन तळवार, विजय बरण्णावर, सद्दाम के. यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एचएमडी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 84 धावा केल्या. त्यात रामचंद्रने 3 षटकारासह 23 तर विजय बारण्णावरने 2 चौकारासह 13 धावा केल्या. विजय तळवार इलेव्हनतर्फे समेद बेल्लदने 26-3 तर अजित व अशोक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजय तळवार इलेव्हन संघाने 8 षटकात सर्वगडी बाद 41 धावा केल्या. त्यात नदीम मौदने 15, तर प्रथमेशने 10 धावा केल्या. एचएमडीतर्फे विजय बारण्णावरने 13 धावांत 3 तर राकेश व मुस्ताकने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात हुक्केरी स्टारने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 85 धावा केल्या. त्यात आरीफ मोकाशीने 8 चौकारासह 37, नयन मोकाशीने 20, आयुब अक्तरने 14 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे राहुल बजंत्रीने 2 तर अमोल यल्लुप्पाचे, अजिम व पार्थ पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना डेपो मास्टर्सने 8 षटकात 9 गडी बाद 71 धावा जमविल्या. त्यात अमोल यल्लुप्पाचेने 4 षटकार, 2 चौकारासह 38 तर विजय कांबळेने 14 धावा केल्या. हुक्केरीतर्फे सद्दामने 9-3 तर मडिवाळ, अब्दुला व सलमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 101 धावा केल्या. त्यात संतोष जाधवने 3 षटकार 7 चौकारासह 25 चेंडूत 61 धावा करुन अर्धशतक झळकविले. मनोज एच.ने 18 धावा केल्या. प्रशांत नाईक वॉरियर्सतर्फे करणने 21-3, सनीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रथमेश नाईकचा डाव 7.1 षटकात 62 धावांत आटोपला. रमेशने 19, करणने 10, रोहीतने 13 धावा केल्या. साईराजतर्फे मनोज, कल्पेश, सागर यांनी प्रत्येकी 2 तर किरणने 1 गडी बाद केला.

चौथ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 104 धावा केल्या. त्यात सुनील गुरवने 3 षटकार 2 चौकारासह 35, मनोज पाटीलने 3 चौकारासह 19, तर चंदन तळवारने 1 षटकार 3 चौकारासह 24 धावा केल्या. अल फतेतर्फे सरफराज देसाईने 2, वासीम, सुनील व विल्सन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अल फते संघाने 8 षटकात 5 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात झुबेर तांबोलीने 1 षटकार 3 चौकारासह 26, सरफराज मुल्लाने 2 षटकारासह 20 धावा केल्या. बालाजीतर्फे चंदन तलवारने 8 धावांत 3 तर सचिन व आकाशने प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील, जी.आय. देवडी, उमेश कलघटगी, चंजवडा भद्रकाली, महेश फगरे, मिलिंद भातकांडे, संतोष पुजारी, राजशेखर तलवार, गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, एम. ए. माऊथ यांच्या हस्ते सामनावीर विजय बारण्णावर, सद्दाम के., संतोष जाधव, चंदन तलवार यांना देण्यात आले. तर इम्पॅक्ट खेळाडू किरण भागाण्णाचे, सुनील गुरव, रामचंद्र हारगुप्पा, अमोल यल्लुप्पाचे यांना चषक देवून गौरविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article