महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘हिजबुल’च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रजासत्ताक दिन सोहळ्यापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने मोठी कारवाई केली आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या टीमने पाच लाखांचे इनाम असलेल्या दहशतवादी जावेद मट्टूला अटक केली आहे. मट्टू हा दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य आहे. अनेक महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या अटकेसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये सातत्याने छापे टाकण्यात येत होते. 26 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यापूर्वी या दहशतवाद्याला अटक करणे अनेक अर्थाने महत्त्वाचे असल्याचे स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी लवकरच अनेक खुलासे होण्याची शक्मयता आहे. स्पेशल सेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव जावेद मट्टू असे असून त्याच्यावर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असण्यासह हत्येचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जम्मू-काश्मीर पोलीसही बराच काळ त्याचा शोध घेत होते. यावेळी दिल्ली स्पेशल सेलच्या टीमला हा दहशतवादी दिल्लीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली. सदर माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने मोठी कारवाई करत त्याला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या विशेष आयुक्तांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जावेद मट्टूबद्दल महत्त्वाची माहिती दिली. जावेद मट्टू या दहशतवाद्याच्या शोधासाठी अनेक राज्यांमध्ये छापेमारी सुरू असल्याचे सेलने सांगितले. हिजबुल मुजाहिद्दीनच्या या दहशतवाद्याला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाकडून त्याची कोठडी घेऊन चौकशी व तपासाची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article