महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायल हल्ल्यात हिजबुल्लाची मोठी हानी

10:09 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भुयारे, चौक्या, बंकर्स ध्वस्त, इराणची पुन्हा धमकी

Advertisement

वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisement

गेल्या सात दिवसांमध्ये लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे सात महत्वाचे नेते ठार केल्यानंतर आता इस्रायलने भूमीवरील कारवाई वेगवान केली आहे. इस्रायलच्या सैनिकांनी आणि रणगाड्यांनी आपल्या देशाच्या उत्तरसीमेवरुन दक्षिण लेबेनॉनमध्ये प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायलच्या या भूमीवरुन केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाची अनेक भुयारे, बंकर्स, शस्त्रागारे, दारुगोळा आणि काही इमारती नष्ट झाल्या असल्याचे प्रतिपादन इस्रायली सेनेने केले.

भूमीवरील कारवाईला इस्रायलने वायुहल्ल्यांचीही जोड दिली आहे. मंगळवारी इस्रायाच्या वायुहल्ल्यात हिजबुल्लाच्या तीन विमानविरोधी रडार व्यवस्थांना लक्ष्य करण्यात येऊन त्यांचा नाश करण्यात आला. यांच्या पैकी एक रडार व्यवस्था लष्कारच्या सुरक्षित भागामध्ये कार्यरत होती. दारा प्रांतातील एक रडार स्थानकही उध्वस्त करण्यात आले. इस्रायलचा भर हिजबुल्लाचे शस्त्रबळ क्षीण करण्यावर आहे.

अचूक कारवाई

इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमध्ये अचूक आणि लक्षकेंद्रीत कारवाई करण्याचे धोरण ठेवले आहे. या योजनेच्या अंतर्गत इस्रायलच्या उच्चप्रशिक्षीत कमांडो दलाने लेबेनॉनच्या काही भागांवर नेमका हल्ला केला. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे हिजबुल्लाची मोठी हानी झाली. या संघटनेने निर्माण केलेली अनेक भुयारे नष्ट झाली. त्यामुळे हिजबुल्लाचा प्रतिकार विस्कळीत झाला होता.

अनेक महिन्यांपासून हल्ले

दक्षिण लेबेनॉनच्या भूमीत शिरुन हल्ले करण्याचे सत्र इस्रायलने गेल्या अनेक महिन्यांपासून चालविले आहे. मात्र, आतापर्यंत या हल्ल्यांना फारशी प्रसिद्धी देण्यात आली नव्हती. मात्र, आता या देशाने उघडपणे हिजबुल्लाविरोधात आघाडी उघडली असून हिजबुल्लाच्या लपण्याचा जागा ध्वस्त करण्याचा आणि या संघटनेच्या दहशतवाद्यांना उघड्या मैदानात आणण्याचा प्रयत्न इस्रायली सेना करीत आहे.

पुनरावृत्ती टाळली

हमासने ज्याप्रमाणे गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये घुसखोरी करुन अत्याचार केले होते, त्याची पुनरावृत्ती करण्याचा हिजबुल्लाचा डाव होता. तथापि, इस्रायलनेच प्रथम दक्षिण लेबेनॉनमध्ये घुसून कारवाईला प्रारंभ केल्याने हिजबुल्लाची योजना फसली, असेही प्रतिपादन इस्रायली सेनेचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी केले. भूतकाळापासून आम्ही धडा घेतला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

पुरावा सादर करणार

हिजबुल्लाने दक्षिण लेबेनॉनमधील खेड्यांना कसे वेठीस धरले आहे आणि तेथे भुयारे आणि बंकर्स कसे निर्माण केले आहेत, याचे सविस्तर व्हिडीओ चित्रण आम्ही जगासाठी लवकरच प्रसारित करु, असे विधान इस्रायलच्या वतीने करण्यात आले. हिजबुल्लाला उध्वस्त करणे, हे या भागातील शांततेसाठी आवश्यक असून हिजबुल्ला नेस्तनाबूत झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अचूक हल्ले चढवून या संघटनेला खिळखिळे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इस्रायलकडू मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले आहे.

हिजबुल्लाकडून इन्कार

इस्रायली सेनेने दक्षिण लेबेनॉनमध्ये प्रवेश केला असल्याच्या वृत्ताचा हिजबुल्लाकडून इन्कार करण्यात आला. आम्ही आमच्या सीमांचे संरक्षण चांगल्या प्रकारे करीत आहोत, असा दावा या संघटनेच्या प्रवक्त्याने केला. तथापि, हा दावा खोटा असल्याचे उपग्रहीय चित्रणावरुन दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे. डॅनिअल हगारी यांनी मंगळवारी सैनिकांच्या शरीरावर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमधून टिपलेल्या दृष्यांचे व्हिडीओ पत्रकार परिषदेत सादर केले

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article