For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिजबुल दहशतवादी यासिर भट बेपत्ता

06:39 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिजबुल दहशतवादी यासिर भट बेपत्ता
Advertisement

जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे राहणारा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिर भट आपल्या घरातून बेपत्ता झाला आहे. 2019 मध्ये जम्मू शहरातील बसस्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात यासिर भटचा समावेश होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तो बेपत्ता झाल्यानंतर जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

मार्च 2019 मध्ये जम्मू बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. तसेच 28 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा आरोपी यासिर भट सध्या घरातून बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी संपूर्ण जम्मूमध्ये यासीरचे पोस्टर्स वितरित केले आहेत. पोलिसांनी लोकांना त्याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

मार्च 2019 मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर काही तासांनी सुरक्षा दलांनी यासिर भटला अटक केली. हा हल्ला करण्यासाठी तो एक दिवस आधी खोऱ्यातून जम्मूत आला होता. हल्ला केल्यानंतर तो परत खोऱ्यात जाण्याचा विचार करत होता. पण, सतर्क सुरक्षा दलांनी त्याला जम्मूपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर पकडले होते.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआऊटच्या यशामुळे दहशतवादी संघटना घाबरल्या आहेत. आता पाकिस्तानच्या मदतीने ते जम्मू भागाला लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत. जम्मू भागात दहशतवादी कारवाया वाढल्या असतानाच त्या रोखण्यासाठी सुरक्षा दलाकडूनही जोरदार प्रयत्न चालवले जात आहेत.

Advertisement
Tags :

.