कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गाडीने धडक देत वार करून खून

03:18 PM Mar 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लोणंद :

Advertisement

आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत प्रेमसंबंधावरून बदनामी केली असा संशय मनात धरून अॅक्टिवा गाडीला पाठीमागून इर्टिगा गाडीने धडक देऊन खाली पडल्यावर कोयत्याने वार करून रत्नशिव संभाजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) यांचा खून केला. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 12 मार्च रोजी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास आदर्की खुर्द गावच्या हद्दीत आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द जाणाऱ्या रोडवर राजेंद्र भालेराव जाधव यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्या घराच्या समोर दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर (रा. आदर्की खुर्द ता. फलटण) याच्या प्रेमसंबंधाबाबत गावात रत्नशिव निंबाळकर याने बदनामी केली आहे असा संशय घेऊन त्याचा राग मनात धरून दत्तात्रेय निंबाळकर याने विनोद राक्षे रा. आदर्की खुर्द याच्याशी संगनमत करून रत्नशिव संभाजी निंबाळकर याचा खून करण्याचा कट रचला. प्रथम त्याची अॅक्टिवा गाडी क्रमांक MH-47-V-0549 याला मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार MH-26-BX-6546 ने पाठीमागून जोराचे धडक दिली. यामध्ये रत्नशिव निंबाळकर हा खाली पडल्यावर त्यास विनोद महादेव राक्षे याने धरून दत्तात्रेय उर्फ काका निंबाळकर याने कोयत्याने हातावर डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे.

लोणंद पोलिसांत कमलेश निंबाळकर यांनी दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, विनोद महादेव राक्षे (दोन्ही रा. आदर्की खुर्द) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यावरुन दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सपोनि सुशील भोसले हे करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article