कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेकॉर्डवरील गुंडास खंडणीप्रकरणी अटक

01:03 PM Jun 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक पाटील याच्यावर दोन दिवसात सलग दोन खंडणीचे गुन्हे कराड शहर व ग्रामीण पोलिसांत दाखल झाले आहेत. वारुंजी फाटा येथील केजीएन मसाला दूध सेंटरसमोर एका तऊणास जबरदस्तीने पैसे उकळून मारहाण केल्याची घटना 2 जून रोजी घडली. दूध सेंटरसह कारची तोडफोड करून परिसरात दहशत माजविणाऱ्या दीपक पाटीलसह त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिल्या. रात्रभर छापे टाकून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अशोक भापकर यांच्या पथकाने संशयिताला अटक केली.

Advertisement

आफताब अमजद मुतवली (वय 20, रा. गोटे, ता. कराड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 जून रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दीपक पाटील, किरण यमकर आणि इतर चार अनोळखी इसमांनी दुकानात येत त्यांच्याकडून तुझे दुकान चांगले चालते. दर महिन्याला चार हजार रुपये दे, अन्यथा तुला व्यवसाय करू देणार नाही अशी धमकी दिली. यानंतर दुकानाच्या गल्ल्यातील 7 हजार रुपये जबरदस्तीने घेतले. लोखंडी रॉडने दुकानाच्या काचांची व आयफोन मोबाईलची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर अथर्व देशमुख यांच्या ब्रिझा कारच्या काचा फोडत सुमारे 65 हजार रुपयांचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केली. या मारहाणीवेळी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ गंभीर जखम झाली.

याच संशयिताने साथीदारांसह पाचवड फाटा (ता. कराड) येथे एका वाईन शॉपमध्ये घुसून जबरदस्तीने दारू व इतर सा†हत्य नेले. या प्रकरणी आठ जणांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामचंद्र चंदवाणी (वय 47, रा. लाहोटीनगर, मलकापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 1 जून रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मालकीच्या वाईन शॉपमध्ये (पाचवड फाटा, नारायणवाडी) काऊंटरवर होते. त्यावेळी दीपक पाटील, शिवतेज तांबे, पंकज पाटील, यशराज पाटील, किरण यमगर, गणेश पाटील यांच्यासह आठही संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देत सात हजारांची दारू जबरदस्तीने पळवली.

सलग दोन घटना घडल्यानंतर उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी स्वत: तपास करत संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपअधीक्षक कार्यालयातील पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना पाचारण केले. भापकर यांनी गुंड दीपक पाटील याच्यावर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. पाटीलवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला महाराष्ट्र बंदी होती. 2014 नंतर पुन्हा गुन्हा दाखल झाला असून त्याच्या संपर्कातील अन्य साथीदारांसह त्याला आश्रय देणाऱ्यांचा शोध सुरू केला असल्याचे अमोल ठाकूर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article