महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उचगाव जागृत मळेकरणी देवस्थान यात्रेवर बंदीचा ऐतिहासिक निर्णय

11:15 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नागरिकांतून निर्णयाचे स्वागत : पशुहत्येवर पूर्णपणे बंदी

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

उचगाव येथील जागृत मळेकरणी देवस्थानमध्ये पशुहत्या करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय सोमवार दि. 27 मे रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबद्दल उचगाव ग्रामस्थांमधून उचगाव ग्राम पंचायत आणि सर्वांचेच या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. मंगळवार दि. 28 मे रोजी देवीची यात्रा भरविण्यात आली. मात्र येत्या शुक्रवार दि. 31 मे रोजी बकरी बळीवर पूर्णपणे बंदी असेल, असे मत उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे व पीडीओ शिवाजी मडवाळ यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केले. उचगाव ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि इतर समस्यांबाबत सोमवारी झालेल्या व्यापक बैठकीमध्ये विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यानुसार मळेकरणी देवस्थानमध्ये पशुहत्या करणे, हे कायद्यानेही गुन्हा आहे. याचीच अंमलबजावणी आता इथून पुढे करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्वानुमते झालेल्या निर्णयानुसार मंगळवार दि. 28 मे रोजी अनेक भाविकांना याची माहिती नसल्याने, तसेच पै-पाहुण्यांना निमंत्रण दिले असल्याने सदर यात्रा करण्यास मुभा देण्यात आली. मात्र शुक्रवार दि. 31 मे रोजी मळेकरणी देवीच्या आमराईत पशुहत्या करण्यावर पूर्णपणे बंदी असेल. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मळेकरणी देवीच्या परिसरात कोणीही आता इथून पुढे यात्रा करणार नाही, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे. तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि उचगाव परिसरात कोणीही यात्रा करू नये, असे उचगाव ग्राम पंचायतच्यावतीने कळविण्यात आले आहे.

शुक्रवारपासून बंदीची अंमलबजावणी...

उचगाव गावची मळेकरणीदेवी हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. या देवीच्या आमराई, मंदिरात कोणालाही पूजा-अर्चा, नवस, ओटी भरणे अशा सर्व कार्यक्रमांना पूर्णपणे मुभा आहे. अलीकडच्या काळात उचगावमध्ये येणाऱ्या भाविकांचा प्रचंड लोंढा यामुळे सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, तळीरामांची वाढलेली गर्दी, गावकऱ्यांना होणारा दुर्गंधीचा त्रास, शेतात फोडण्यात येणाऱ्या काचेच्या बॉटल्स, केरकचरा या सर्वांचा विचार करता उचगाव गावची बिघडत चाललेली संस्कृती कुठेतरी थांबली पाहिजे, यासाठीच ग्राम पंचायत, ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे. याला सर्वांनी सहकार्य करावे. इथून पुढे देवीच्या आमराईत पशुहत्या करण्यावर पूर्णपणे बंदी असेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

- मथुरा बाळकृष्ण तेरसे, अध्यक्षा उचगाव ग्राम पंचायत

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article