हिंदुत्व भारताचा आत्मा : संघ सरकार्यवाह
धर्मांतरविरोधी कायदे कठोरपणे लागू करावेत : दत्तात्रेय होसबाळे
वृत्तसंस्था/ इंदोर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी हिंदुत्वाच्या संकल्पनेवर स्वत:चे विचार मांडले आहेत. हिंदुत्व हा भारताचा आत्मा आहे. लोकांमध्ये जागरुकता वाढवून, सामाजिक मिलाप वाळवून आणि कायद्यांना कठोरपणे लागू करत धर्मांतर रोखले जाऊ शकते असे सरकार्यवाह होसबाळे यांनी म्हटले आहे.
पूर्ण सृष्टीला एक मानणारा असा आमचा भारत आहे. हिंदू संस्कृती अनेक प्रकारे व्यक्त होते आणि यात विविधता आहे, परंतु याचे मूळ एक आहे. धर्मजागरण, सेवाकार्य, सामाजिक भागीदारी, संतांचे दौरे आणि कायद्यांना कठोरपणे लागू करून धर्मांतराला रोखता येऊ शकते असे होसबाळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
संकल्पना समजण्याची गरज
भारतीय संस्कृतीत धर्माची संकल्पना केवळ इंग्रजी शब्द ‘रिलिजन’पुरती मर्यादित नाही आणि याला व्यापक स्तरावर समजण्याची गरज आहे. रिलिजन बदलला जाऊ शकतो, परंतु धर्म नाही. जर धर्म बदलण्यामागील हेतू चुकीचा असेल तर सावध राहणे आणि अशाप्रकारच्या कार्यांना रोखण्याची आवश्यकता असल्याचे होसबाळे यांनी म्हटले आहे.
संघटनेकडून व्यापक कार्य
इंदोर येथे आयोजित ‘प्रमुख जन गोष्ठी’मध्ये होसबाळे यांनी स्वत:चे विचार मांडले आहेत. 1975 मधील आणीबाणी आणि अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान संघ स्वयंसेवकांच्या संघर्षाला आठवत होसबाळे यांनी संघटनेने समाजाच्या समर्थनाद्वारे मागील शतकात 1 लाखाहून अधिक सेवाकार्ये केली असल्याचे नमूद केले. धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर अडून राहिल्याने काही लोक स्वत:च्या हिंदू म्हणवून घेणे टाळत आहे. याचमुळे हिंदुत्वाच्या मुख्य विचारांना युवापिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.