For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हिंदुस्थान युनिलिव्हरकडून कर्मचारी कपातीचा झटका

06:41 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदुस्थान युनिलिव्हरकडून कर्मचारी कपातीचा झटका

एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी : 7500 कर्मचारी कपातीचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर जगभरातील आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास हजारो कर्मचारी येत्या काळामध्ये कंपनीकडून कमी केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

अंतर्गत खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे मार्जिनमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले असल्याचे सांगितले जात आहे. गुंतवणूकदारांकडून या संदर्भातील कंपनीच्या निर्णयाचे सकारात्मकपणे स्वागत केले जात आहे. कंपनीने सांगितले, की आगामी काळामध्ये आईक्रीमचा व्यवसाय हा स्वतंत्र स्वरूपात कंपनी स्थापन करणार आहे.

Advertisement

विभाजन प्रक्रिया सुरु

व्यवसाय विभाजनाच्या प्रक्रियेला तात्काळ सुरुवात झाली असून 2025 च्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असेही हिंदुस्थान युनिलिव्हरने सांगितले आहे. या अंतर्गत आगामी काळामध्ये जगभरातील कंपनीतील 7500 कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीतील एकूण कर्मचारी संख्येपैकी 5.9टक्के इतकी कर्मचारी कपात केली जाणार आहे.

विकास एक अंकी

कंपनीने विकासाबाबत बोलताना म्हटले की, आगामी काळामध्ये एक अंकी विकास होणे अपेक्षीत आहे. कंपनीच्या या नव्या वरील उचललेल्या पावलामुळे पुढील तीन वर्षांमध्ये जवळपास 87 कोटी डॉलरची बचत होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
×

.