हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शनला 2470 कोटीचे कंत्राट
नवी दिल्ली’:
हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या समभागाने शुक्रवारी 15 टक्क्यांची उसळली घेतली होती. कंपनीला 2470 कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट प्राप्त झाले. या बातमीनंतर हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शनचा समभाग शुक्रवारी 15 टक्के वाढत 28 रुपयांवर पोहोचला होता. टाटा प्रोजेक्ससमवेत हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शन संयुक्तरित्या प्रकल्प राबवत असते. कंपनीला महाराष्ट्रातील कर्जतमध्ये एका प्रकल्पाचे काम टाटा पॉवर कंपनी लिमीटेडकडून प्राप्त झाले आहे. 20470 कोटी रुपयांचे हे कंत्राट असणार असल्याची माहिती मिळते आहे.
हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शनचा समभाग गेल्या एक आठवड्यामध्ये 20 टक्के वाढला असून तीन महिन्यात 37 टक्के घसरला आहे. गेल्या एक वर्षभरामध्ये पाहता 17 टक्के इतका समभाग खाली आला आहे. हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शन कंपनी एक अभियांत्रिकी आणि निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या क्षेत्रामध्ये परिवहन, विज, पाणी आणि इमारतींच्या देखभालीचे काम कंपनी करते.