महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ज्ञानवापी’त हिंदूंना पूजेचा अधिकार

06:41 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : हिंदूंचा अभियोगही वैध

Advertisement

वृत्तसंस्था / अलाहाबाद

Advertisement

ज्ञानवापी परिसरात पूजा करण्याचा हिंदूंना अधिकार आहे. तसेच हिंदू पक्षकारांनी या स्थानावर अधिकार सांगण्यासाठी सादर केलेला अभियोगही विधीवत वैध आहे. पूजास्थान कायद्याचा कोणताही अडथळा या अभियोगाला नाही, असा स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत.

हा आदेश उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने दिला. हे प्रकरण भारतातील दोन मोठ्या समाजांशी संबंधित आहे. त्यामुळे ते अधिक काळ प्रलंबित ठेवण्यात येऊ नये. आगामी सहा महिन्यांमध्ये ते पूर्ण करावे, असा आदेशही न्या. रोहित अग्रवाल यांनी कनिष्ठ न्यायालयाला या निर्णयाद्वारे दिला आहे.

वाराणसी न्यायालयात अभियोग

हिंदू पक्षकारांनी ज्ञानवापी परिसरासंबंधीचा हा अभियोग वाराणसीच्या न्यायालयात सादर केला आहे. वाराणसीतील ज्ञानवापी परिसर हा प्राचीन काळापासून हिंदू मंदिराचा परिसर होता. हे मंदिर भगवान महादेवांचे होते. मुस्लीम आक्रमकांनी ते पाडवून तेथे मशीद बांधली आणि हा परिसर आक्रमण करुन ताब्यात घेतला. तो आता हिंदूंना परत देण्यात यावा. तसेच येथे मशिदीच्या स्थानी मंदिराचे निर्माणकार्य करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या नागरी अभियोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याची हाताळणी होत आहे.

मुस्लीमांचा आक्षेप

1991 मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील तत्कालीन केंद्र सरकारने पूजास्थान कायदा संमत करुन कोणत्याही प्रार्थनास्थळाच्या स्वरुपात परिवर्तन करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ज्ञानवापीसंबंधीचा हा अभियोग या कायद्याच्या तरतुदींच्या अनुसार कायदेशीर ठरत नाही. त्यामुळे तो फेटाळला जावा, असे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे आहे. मात्र, ते मंगळवारी फेटाळण्यात आले आहे.

मशीद हा मंदिराचाच भाग

सध्या या स्थानी असणारी मशीद हा हिंदू मंदिराचाच एक भाग आहे, असेही प्रतिपादन हिंदू पक्षकारांनी केले आहे. ही मशीद बेकायदेशीरपणे उभी करण्यात आली आहे. याचे भक्कम पुरावे आहेत. अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे या सत्यावर प्रकाश टाकतात. त्यामुळे हिंदूंचा पक्ष या नागरी अभियोगात भक्कम आहे, अशी माहिती हिंदू पक्षकारांच्या वतीने मंगळवारी देण्यात आली आहे.

पूजा करण्याचा अधिकार

ज्ञानवापी परिसरात मशीद असली तरी येथे पूजा करण्याचा हिंदूंचा अधिकार अबाधित आहे. त्यामुळे तो तसाच राहिला पाहिजे. हिंदूना येथे नित्यपूजा आणि नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. या अभियोगावर अंतिम निर्णय येईपर्यंत हा अधिकार आहे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

प्रकरणाचा ऐतिहासिक संदर्भ

वाराणसी हे भगवान महादेवांचे स्थान आहे. ज्ञानवापी परिसरात त्यांचे मंदिर प्राचीन काळापासून होते. 17 व्या शतकात औरंगजेबाच्या आदेशावरुन ते पाडविण्यात आले होते. त्यानंतर या परिसरात मंदिराच्या स्थानी मशीद बांधण्यात आली. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाल्यानंतर हिंदूंनी पुन्हा मशिदीच्या शेजारी मंदिर स्थापन केले. आता हिंदूंनी या पूर्ण परिसरावर अधिकार सांगितला आहे. न्यायालयात त्यासाठी आवेदन सादर करण्यात आले आहे. येथे असलेल्या मशिदीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मुस्लिमांच्या मंडळाने या आवेदनाला विरोध केला आहे. त्यामुळे न्यायालयातच ही भूमी कोणाची, याचा निर्णय होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article