महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशाच्या लोकसंख्येत 6 टक्क्यांनी घटले हिंदू

06:09 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतात 1950 पासून 2015 पर्यंत 65 वर्षांमध्ये बहुसंख्याक हिंदूंच्या संख्येत मोठी घट नोंदली गेली आहे. या कालावधीत देशाच्या लोकसंख्येत हिंदूंच्या हिस्सेदारीत 6 टक्क्यांची घट झाली आहे. तर पाकिस्तान, बांगलादेश यासारख्या अन्य देशांची तुलना केली तर तेथील बहुसंख्याक मुस्लिमांची लोकसंख्येतील हिस्सेदारी वेगाने वाढली आहे. अध्ययनानुसार एकीकडे भारतात हिंदूंची हिस्सेदारी घटली आहे, तर अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिखांच्या संख्येत वाढ झाली आहे. हिंदूंसोबत जैन आणि पारशी समुदायाचीही लोकसंख्येतील हिस्सेदारी घटली आहे.

Advertisement

अध्ययनानुसार संबंधित कालावधीत मुस्लिमांची हिस्सेदारी 5 टक्क्यांनी वाढली आहे. तर ख्रिश्चनांच्या हिस्सेदारीत 5.38 टक्के, शिखांच्या हिस्सेदारीत 6.58 टक्क्यांची वाढ झाली आहे. बौद्धांचीही हिस्सेदारी वाढली आहे. अहवालानुसार 1950 मध्ये भारताच्या लोकसंख्येत हिंदूंची हिस्सेदारी 84 टक्के होती. आता देशाच्या लोकसंख्येत हिंदू 78 टक्के आहेत. मुस्लीम 65 वर्षांपूर्वी भारताच्या लोकसंख्येत 9.84 टक्के होते. हे प्रमाण आता वाढून 14.09 टक्के झाले आहे.

भारतासोबत म्यानमार आणि नेपाळमध्येही बहुसंख्याकांची हिस्सेदारी कमी झाली आहे. म्यानमार या बौद्धबहुल देशात बौद्ध समुदायाची लोकसंख्येतील हिस्सेदारी 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर भारतात हिंदूंची लोकसंख्येतील हिस्सेदारी 7.8 टक्क्यांनी घटली आहे. नेपाळमध्ये बहुसंख्याक हिंदूंची लोकसंख्येतील हिस्सेदारी 3.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने स्वत:च्या अहवालात एकूण 167 देशांचे अध्ययन केले आहे. जागतिक ट्रेंड पाहता भारतात एक स्थिरता दिसून आली आहे. भारतात अल्पसंख्याकांना संरक्षण प्राप्त असल्याने त्यांची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे.

बांगलादेश, पाकिस्तानात उलट स्थिती

एकीकडे भारताच्या लोकसंख्येत बहुसंख्याक हिंदूंची हिस्सेदारी घटली आहे. तर शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेशात बहुसंख्याक मुस्लिमांची संख्या वेगाने वाढली आहे. बांगलादेशात मुस्लिमांची हिस्सेदारी 18.5 टक्क्यांनी वाढली आहे. तर पाकिस्तानात हे प्रमाण 3.75 टक्क्यांनी वाढले आहे. अफगाणिस्तानात 0.29 टक्क्यांनी मुस्लिमांच्या हिस्सेदारीत भर पडली आहे. बौद्धबहुल भूतान आणि श्रीलंकेत बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. भूतानमध्ये बौद्धांची लोकसंख्येतील हिस्सेदारी 65 वर्षांमध्ये 17.6 टक्क्यांनी वाढली, तर श्रीलंकेत हा आकडा 5.25 टक्के राहिला आहे.

Advertisement
Next Article