हिंदु जनजागृती समितीतर्फे किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम
मालवण । प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार ३० नोव्हेंबर रोजी 'एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात' ही मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानी माता यांच्या चरणी पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून मोहिमेला प्रारंभ केला. या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्याची स्वच्छता, श्री भवानी देवीचा नामजप, गड भ्रमंती, स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली. यावेळी किल्ल्यावरील पाला पाचोळा, प्लास्टिक कचरा, गवत काढून काटेरी झाडी तोडण्यात आल्या.या मोहिमेत जिल्ह्यातील ५० शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.उपस्थित सर्व शिवप्रेमींना गडावरील स्थानिक शिवप्रेमी श्री. हितेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला.श्री शिवराजेश्वर मंदिराचे अध्यक्ष आणि मुख्य पुजारी श्री. सयाजी सकपाळ यांचे उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन सर्व शिवप्रमी हिंदुराष्ट्रासाठी कटिबध्द झाले.