महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यातील हिंदूबांधव, संघटना अजूनपर्यंत शांत

12:41 PM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 अन्यथा चर्चचे उत्खनन करण्यास भाग पाडू : हिंदू रक्षा महाआघाडीचा इशारा

Advertisement

प्रतिनिधी / पणजी

Advertisement

गोव्यातील हिंदूबांधव आणि विविध हिंदू संघटना अजूनपर्यंत शांत आहेत. त्यांच्या शांततेचा अंत पाहू नये. अन्यथा राज्यात पोर्तुगीजांनी जी जी मंदिरे पाडून चर्च उभ्या केल्या आहेत त्याचे उत्खनन करून त्या ठिकाणी असलेल्या मंदिरांचे पुरावे शोधून काढू आणि अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच पुन्हा मंदिरे उभी करण्यास सरकारला भाग पाडू, असा खणखणीत इशारा हिंदू रक्षा महासंघटनेने दिला आहे. ज्या मंदिरांच्या जागा आहेत त्या मंदिरांसाठी सोडा तेथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नका, सांकवाळ येथील विजयादुर्गा देवीच्या मंदिराच्या जाग्यावर चर्च संस्थेचे जे बेकायदेशीर कारभार सुऊ आहेत ते त्वरित थांबवा, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुभाष वेलिंगकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शुभा सावंत, चंद्रकांत पंडित व अन्य मान्यवर उपस्थित होते.  सांकवाळ येथील 1983 साली पुरातन पुरातत्व खात्याने वारसास्थळ म्हणून आरक्षित केलेली जागा विजयदुर्गा देवी मंदिराची असून तसे पुरावेही आहेत. या जमिनीत चर्च संस्थेने बेकायदेशीर बांधकाम सुऊ केले आहे. पोर्तुगीजांनी ते मंदिर मोडून चर्च बांधण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ते जमले नाही. जे पोर्तुगीजांना जमले नाही ते आता चर्च संस्था करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र हिंदू संघटना त्यांचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही. गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू असा इशाराही वेलिंगकर यांनी दिला आहे.

चर्च संस्थेने 2012 साली सपाटीकरण कऊन मंदिराच्या जागेतील तळी बुजविली तसेच भले मोठे वडाचे झाड, मंदिराचे अवशेषही नष्ट करण्यात आले. नंतर  2018 सालापासून या जागेत घुसखोरी करणे सुऊ केले आहे. सरकारला वेळोवेळी निवेदने दिली आहेत तसेच निदर्शनेही केली जात आहे. सरकार मात्र या गोष्टीकडे मुद्दामहून कानाडेळा करीत आहेत. आज ज्या जागी खूरीस लावण्यात आले आहे त्या ठिकाणी शिवलिंग होते, असेही वेलिंगकर म्हणाले.

याच जागेत चर्च संस्था 7 ते 16 जानेवारी या काळात फेस्त भरविणार आहे त्यासाठी बेकादेशीररित्या मांडवांचे बांधकाम सुऊ केले आहे. वास्तविक सांकवाळ फेस्त हे शिंदोळी येथे होते मात्र मंदिराची जागा बळकविण्यासाठी शिंदोळी येथे होणारे फेस्त चर्च मंदिराच्या जागेत करू पाहत आहे. शिंदोळीहून फेस्त हलविण्याच्या प्रयत्नाला शिंदोळी येथील ख्रिस्ती बांधवानी विरोध केला आणि शिंदोळी चर्चच्या परिसरात फेस्त करण्याचा प्रयत्न केला असता फेस्त दिवशी शिंदोळी येथील चर्चला कुलुप ठोकण्यात येते. शिंदोळी ते मंदिरांची जागा यात सुमारे पाच किलोमीटरचे अंतर आहे. केवळ मंदिराची जागा बळकाविण्यासाठी चर्च संस्थेचे हे प्रयत्न असून त्याला कठोर विरोध करणे गरजेचे आहे, असेही विलिंगकर म्हणाले.

Advertisement
Next Article