महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोहोळ तालुक्यातील पैलवानाने मारले हिंद केसरीचे मैदान!

02:44 PM Feb 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
Hindkesari tournament Telangana
Advertisement

बोलू खत्रीचा पराभव करत समाधान पाटील राष्ट्रीय विजेता;राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम
मोहोळ तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

पाटकुल प्रतिनिधी

राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सलग दुसऱ्या वर्षी मोहोर उमटली आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पैलवान समाधान पाटील हा २०२४  सालचा हिंदकेसरी ठरला आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपले नाव कोरले. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा हिंद केसरी स्पर्धा आहे.

Advertisement

समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील  नाजिक पिंपरी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला हा किताब मिळाला.

Advertisement

यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात जाते की दिल्लीकडे जाते, याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर सलग दुसऱ्या वर्षी ही गदा महाराष्ट्रात आली.

मागील वर्षी ‘हिंदकेसरी’चा किताब महाराष्ट्रातील अभिजीत कटके याने पटकवला होता त्यानंतर यंदाच्या वर्षी समाधान पाटलाने हा किताब पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे.

सोलापुरातील श्रीकृष्ण आखाडा या तालमीत पाटील सराव करीत होते. वस्ताद भरत मेकाले यांचे  मार्गदर्शन तसेच या कुस्ती स्पर्धेसाठी रवी शेळके, धोंडीराम निंबाळकर ,धनाजी व्यवहारे ,रमेश पांढरे ,चंद्रकांत धोत्रे या सर्व वस्तदांची यावेळी मोलाची साथ मिळाली

आज पर्यंतचे पटकाविलेले किताब :- 
* मुख्यमंत्री केसरी
*उप महाराष्ट्र केसरी
* मुंबई महापौर केसरी  - ०२ वेळा
* स्टेट महाराष्ट्र चॅम्पियन
* सोलापूर सिद्धेश्वर केसरी - ०२ वेळा
* मोहोळ नागनाथ केसरी सलग तीन वेळा

उपमहाराष्ट्र केसरी’ किताब मिळवला :-
समाधान पाटील हा मूळचा मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावचा रहिवासी आहे. समाधानने २०१० सालपासून पैलवानकीस सुरुवात केली आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या ‘सीएम केसरी’चा किताब तसेच २०१७ सालचा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकवला आहे. समाधान पाटील हा सोलापुरातील भरत मेकाले यांच्या तालमीत सराव करत होता. त्यानंतर काही काळ दिल्लीतही सराव केला आहे.

 

Advertisement
Tags :
Hindkesari tournamentmaharashtraSamadhan Patiltarun bharat news
Next Article