कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस शासनकाळात हिंदी होती अनिवार्य भाषा

06:30 AM Mar 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचा मोठा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुचिरापल्ली

Advertisement

तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारच्या काळात हिंदी अनिवार्य तिसरी भाषा होती असा दावा केला आहे. कुठल्याही भारतीय भाषेला तिसऱ्या भाषेत शिकण्याचा पर्याय देण्याचा निर्णय वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला असल्याचे अण्णमलाई यानी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी तमिळ भाषेला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत अनिवार्य शिक्षणाचे माध्यम केले आहे. अनेक वर्षांपर्यत तामिळनाडूच्या सत्तेवर राहूनही द्रमुकने कधीच तमिळला शिक्षणाचे अनिवार्य माध्यम करण्याचा निर्णय घेतला नव्हता अशी टीका अण्णामलाई यांनी नव्या शिक्षण धोरणाचा उल्लेख करत केली आहे.

3 भाषा धोरणाचा उल्लेख

चीन, जर्मनी आणि जपान यासारखे देश महत्त्वपूर्ण ठरले कारण ते मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देतात. पहिल्या दोन शिक्षण धोरणांमध्sय हिंदी अनिवार्य तिसरी भाषा होती. मे 2019 मध्ये देशात पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता कुठल्याही भारतीय भाषेची निवड करण्याचा पर्याय दिला आहे. हे तीन भाषा धोरण असल्याचे अण्णामलाई यांनी एका जाहीर सभेत म्हटले आहे.

द्रमुकवर साधला निशाणा

तामिळनाडूतील द्रमुक हा पक्ष 10 वर्षांपर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील होता, त्या काळात हिंदी अनिवार्य तिसरी भाषा होती. पहिल्यांदाच मोदी सरकारने लागू केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची तिसरी भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि तेलगू, कन्नड, मल्याळी किंवा हिंदीपैकी कुठलीही भाषा शिकता येणार आहे. नव्या शिक्षण धोरण आणि तीन भाषा धोरणाच्या समर्थनार्थ चालू महिन्यात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत 18 दिवसांमध्ये 26 लाख जणांचे समर्थन मिळाल्याचे अण्णामलाई यांनी सांगितले आहे.

राज्याच्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप

द्रमुकने अनेक स्वाक्षरी मोहिमा सुरू केल्या असून यात नीट विरोधातील अभियान देखील सामील आहे. द्रमुकच्या नीटविरोधी स्वाक्षरी मोहिमेचे काय झाले?  किती लोकांनी स्वाक्षरी केली कुणालाच माहित नाही. राज्याच्या मंत्र्यांसह अनेक द्रमुक नेते उत्तर भारतीयांविषयी आक्षेपार्ह बोलत असून यावर माझा आक्षेप आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे द्रमुक 2026 च्या विधानसभा निवडणुकीत 200 हून  अधिक जागा जिंकणार या भ्रमात असल्याची टीका अण्णामलाई यांनी केली आहे

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article