महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेशात आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान

06:45 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यात 76.22 टक्के मतदानाची नोंद, छत्तीसगडमध्ये 76.31 टक्के

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानाची सुधारित आणि अंतिम टक्केवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या टक्केवारीनुसार मध्यप्रदेशात आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान नोंदविले गेले असून ते 76.22 टक्के इतके आहे. गेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी या राज्यात 75.63 टक्के इतकी होती.

छत्तीसगडमध्येही जवळपास मागच्या निवडणुकीइतकीच मतांची टक्केवारी गाठली गेली आहे. या राज्यात अंतिम आकडेवारीनुसार 76.31 टक्के मतदान झाले असून ते मागच्या निवडणुकीपेक्षा किंचित कमी आहे. गेल्यावेळी याच राज्यात 76.88 टक्के मतदान झाले होते. यावेळी दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी अतिशय उत्साहात मतदान गेल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

प्रत्येक निवडणुकीत वाढ

मध्यप्रदेशात 2003 पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेलाr आहे. 2003 मध्ये 67.25 टक्के, 2008 मध्ये 69.78 टक्के, 2013 मध्ये 72.13 टक्के तर 2018 मध्ये 75.63 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत राज्याने मतदानाचा आतापर्यंतचा विक्रम केला आहे.

किंचित कमी पण समाधानकारक

छत्तीसगडमध्ये जवळपास मागच्याएवढीच टक्केवारी गाठली गेली आहे. मात्र, ती त्यावेळपेक्षा किंचित कमी आहे. दोन्ही राज्यांमध्ये यावेळी शहरी भागांमध्येही भरभरुन मतदान झाल्याने मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशात भोपाळसारख्या शहरी भागातही मतदानाने जवळपास 68 टक्क्यांची पातळी गाठली असल्याने आता परिणामांची चर्चा राजकीय तज्ञांनी सुरु केली आहे.

वाढीव मतदानाचा लाभ कोणाला ?

मतदानाची वाढती टक्केवारी हा सत्तापरिवर्तनाचा संकेत मानला जातो. तथापि, हा निश्चित नियम नाही. मध्यप्रदेशने पूर्वी या नियमाला अपवाद केलेला आहे. 2003 मध्ये प्रथम येथे भाजपचे राज्य आले. त्यानंतर 2008 मध्ये मतदानाची टक्केवारी साधारणत: अडीच टक्क्यांनी वाढली. तरीही पुन्हा भाजपचेच सरकार निवडून आले. त्यानंतर 2013 मध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. पण त्यावेळीही मतांची टक्केवारी आणखी वाढून ती 72.13 टक्के झाली होती. नंतर 2018 मध्ये मतांच्या टक्केवारीत जवळपास साडेतीन टक्क्यांची वाढ झाली. त्यावेळी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या पण पूर्ण बहुमत मिळाले नाही. तसेच, भाजपला जागा काँग्रेसपेक्षा कमी मिळाल्या असल्या तरी मते पाव टक्का जास्त मिळाली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली की सत्तापरिवर्तन होते हा समज मध्यप्रदेशने आतापर्यंत किमान तीनवेळा चुकीचा ठरविला आहे.

उत्सुकता शिगेला

या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार याची मोठी उत्सुकता या राज्यांमध्ये आणि देशातही आहे. विविध तज्ञ आणि राजकीय पक्ष आपापल्या माहितीप्रमाणे प्रतिपादने करीत आहेत. तथापि, नेमके अनुमान वर्तविणे यावेळी शक्य नाही, असेही अनेक तज्ञांचे मत आहे. परिणामांची थोडी कल्पना 30 नोव्हेंबरला मतदानोत्तर सर्वेक्षणांमधून येणार आहे. पण प्रत्यक्ष परिणामांसाठी 3 डिसेंबरचीच वाट पहावी लागणार आहे.

आता अनुमानांचे पीक

ड मध्यप्रदेशातील विक्रमी मतदानानंतर आता अनुमानांच्या मांडणीचा प्रारंभ

ड छत्तीगडमध्येही गेल्यावेळेइतकेच जवळपास गेल्यावेळेएवढेच झाले मतदान

ड कोण विजयी होणार, की विधानसभा त्रिशंकू होणार, यावर लागल्या पैजा

ड सर्व राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल गुलदस्त्यात

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article