For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आहारावर बिहारच्या लोकांकडून सर्वाधिक खर्च

06:25 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
आहारावर बिहारच्या लोकांकडून सर्वाधिक खर्च
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राहणीमानाच्या एकूण खर्चात खाण्यापिण्याच्या गोष्टींची हिस्सेदारी पूर्ण देशाच्या पातळीवर मागील 10 वर्षांमध्ये कमी होत 50 टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. परंतु बिहार आणि आसाम यासारख्या राज्यांमध्ये हे प्रमाण अद्याप यापेक्षा अधिक आहे. बिहार आणि आसामच्या लोकांच्या एकूण खर्चात आहाराच्या गोष्टींचा हिस्सा सर्वाधिक आहे. तेलंगणा आणि केरळात हे प्रमाण सर्वात कमी आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यासारख्या राज्यांमधील लोक खाण्यापिण्यात दूध आणि त्याद्वारे निर्मित गोष्टींवर सर्वाधिक खर्च करत आहेत. यासंबंधीची माहिती हाउसहोल्ड कंजम्पशन एक्सपेंडिचर सर्वे 2022-23 च्या विस्तृत अहवालातून समोर आली आहे. याला स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मंत्रालयाने जारी केले आहे.

अहवालानुसार एकूण व्यय खर्चात खाण्यापिण्याच्या सामग्रीची हिस्सेदारी बिहार आणि आसाममध्ये सर्वाधिक 54 आहे. तर केळमध्ये हे प्रमाण सर्वात कमी 39 टक्के आहे. शहरी भागांमध्ये हा आकडा बिहार आणि आसाममध्ये सर्वाधिक 47 टक्के राहिला. तर सर्वात कमी 35 टक्के हिस्सेदारी तेलंगणात राहिली आहे. उत्तरप्रदेशच्या ग्रामीण भागांमध्ये दरडोई एकूण खर्चात खाद्यपदार्थांचा हिस्सा 47 टक्के आणि शहरी भागांमध्ये 41 टक्के आहे. महाराष्ट्रात हा आकडा अनुक्रमे 41 टक्के आणि 37 टक्के आहे.

Advertisement

10 वर्षांमध्ये हिस्सेदारी झाली कमी

मागील 10 वर्षांमध्ये मासिक सरासरी कॅपिटा कंजम्पशन एक्सपेंडिचरमध्ये (एमपीसीई) आहारावरील खर्च घटला आहे. 2011-12 मध्ये ग्रामीण भागांमध्ये एकूण मासिक खर्चात आहाराची हिस्सेदारी 52.9 टक्sक हीत. 2022-23 मध्ये हे प्रमाण 46.4 टक्क्यांवर आले. शहरांमध्ये देखील आकडा 42.6 टक्क्यांवरुन कमी होत 39.2 टक्के झाला आहे. गावांमध्ये खाण्यापिण्यावर प्रत्येक व्यक्तीचा एक महिन्याचा खर्च सरासरी 1750 रुपये तर शहरांमध्ये 2530 रुपये राहिला आहे.

हरियाणात दूधावर अधिक खर्च

टोटल फूड कंजम्पशनमध्ये बेव्हरेजेज आणि प्रकृयाकृत खाद्यपदार्थांची हिस्सेदारी वाढली असून राष्ट्रीय सरासरी 9.6 टक्के आहे. बहुतांश राज्यांमध्ये सर्वाधिक खर्च याचकरता झाला आहे. दूध आणि त्याद्वारे निर्मित उत्पादनांची राष्ट्रीय हिस्सेदारी 8.3 टक्के आहे. परंतु हरियाणा (41.7 टक्के), राजस्थान (35.5 टक्के), पंजाब (34.7 टक्के), गुजरात (25.5 टक्के), उत्तरप्रदेश (22.6 टक्के) आणि मध्यप्रदेशात (21.5 टक्के) दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा हिस्सा फूड कंजम्पशनमध्ये सर्वाधिक आहे. राजस्थान (33.2 टक्के), हरियाणा (33.1 टक्के), पंजाब (32.3 टक्के) आणि उत्तरप्रदेशच्या (25.2 टक्के) शहरी भागांमध्ये देखील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा हिस्सा सर्वाधिक आहे.

माशांवर सर्वाधिक खर्च केरळमध्ये

खाण्यापिण्यातील एकूण खर्चात अंडी, मांसे आणि मांसाची सर्वाधिक 23.5 टक्के हिस्सेदारी केरळच्या ग्रामीण भागांमध्ये आहे. यानंतर आसाम (20 टक्के) आणि पश्चिम बंगालचा (18.96 टक्के) क्रमांक लागतो. सर्वात कमी 2.1 टक्के हिस्सेदारी हरियाणाच्या ग्रामीण भागांमध्ये आहे. 2.6 टक्के हिस्स्यावर गुजरात आणि राजस्थानही यादीच्या तळाला आहे.  शहरी भागांमध्ये आहारात अंडी, मासे आणि मांसाच्या हिस्सेदारीप्रकरणी केरळ 19.8 टक्के आणि पश्चिम बंगाल 18.9 टक्क्यांच्या हिस्सेदारीसह आघाडीवर आहेत.

बंगालमध्ये धान्याचा सर्वाधिक वापर

धान्याप्रकरणी दरडोई दर महिन्याला सर्वाधिक 11.23 किलोचा वापर पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागांमध्ये आहे. यानंतर ओडिशा (11.21 किलो), बिहार (11.14 किलो) आणि राजस्थान (10.55 किलो)चा क्रमांक लागतो. उत्तरप्रदेशात 9.38 किलो आणि महाराष्ट्रात 8.31 किलो धान्याचा वापर होतो. प्रती व्यक्तीमागे सर्वात कमी 6.6 किलो धान्याचा वापर केरळमध्ये होतो. तांदळाची सर्वाधिक 95.93 टक्के हिस्सेदारी आसाममध्ये आहे. यानंतर छत्तीसगड (92.24 टक्के) आणि तेलंगणाचा (92.06 टक्के) क्रमांक आहे. उत्तरप्रदेशात हे प्रमाण 39.99 टक्के आणि महाराष्ट्रात 39.39 टक्के आहे. तांदळाची आहारातील सर्वात कमी हिस्सेदारी राजस्थानमध्ये आहे. तेथे केवळ 3.19 टक्के हिस्सेदारी आहे.

Advertisement
Tags :

.