येडियुराप्पांविरुद्धचे पोक्सो प्रकरण रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार
बेंगळूर : अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याच्या आरोपाखाली माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध दाखल झालेले पोक्सो प्रकरण रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.आपल्याविरुद्धचे प्रकरण रद्द करावे, अशी याचिका येडियुराप्पांनी दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एम. आय. अरुण यांनी सुनावणी केली. कथित आरोप विचारात घेऊन येडियुराप्पा यांना कनिष्ठ न्यायालयाने समन्स बजावले होते. उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणीवेळी 28 फेब्रुवारी रोजी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश उचलून धरला. मात्र, खटल्याच्या सुनावणीवेळी विनाकारण उपस्थितीसाठी भाग पाडले जाऊ नये. त्यांची उपस्थिती आवश्यक नसेल तर सुनावणीला हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी त्यांनी दाखल केलेल्या कोणत्याही अर्जाची दखल घ्यावी, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये बेंगळुरातील भेटीप्रसंगी येडियुराप्पा यांनी माझ्या 17 वर्षीय मुलीचा लैंगिक शोषण केले, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला होता. या प्रकरणी 14 मार्च 2024 रोजी पोक्सो अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता.