कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आलमट्टी परिसराला हायअलर्ट, कडेकोट बंदोबस्त

11:56 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनांची कसून तपासणी : परवानगीशिवाय वाहनांना बंदी

Advertisement

वार्ताहर/विजापूर/जमखंडी

Advertisement

भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, दहशतवाद्यांच्या यादीतील आलमट्टी धरणावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहनधारकांची कडक तपासणी करण्यात येत आहे. आलमट्टी जलाशयाची सुरक्षा कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या केएसआयएसएफ अखत्यारीत आहे. 24 तास अत्यंत दक्षतेने सुरक्षा पुरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस विभागाकडून सर्व धरणांच्या आजूबाजूला सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील आलमट्टी पेट्रोलपंपापासून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची माहिती नोंदवली जात आहे. आवश्यकता वाटल्यास वाहनांची तपासणी केली जात आहे. केएसआयएसएफचे निरीक्षक शिवलिंग कुरेंणावर यांनी सांगितले की, आधुनिक शस्त्रास्त्रs, बंदुका आणि बॉम्बसुद्धा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, असे सांगितले. आलमट्टी पेट्रोल पंप आणि जवाहर नवोदय विद्यालयाजवळील गेटमधून आलमट्टीमध्ये अवजड वाहने आणि मालवाहतुकीच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ केबीजेएनएल अधिकाऱ्यांची परवानगी असल्यासच अशा वाहनांना प्रवेश दिला जात आहे. धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक असिस्टंट कमांडर, दोन निरीक्षक, एक पीएसआय, 17 एएसआय आणि 65 पोलीस कर्मचारी 24 तास शिफ्टनुसार ड्युटीवर तैनात करण्यात आले आहेत.

 बॅकवॉटर क्षेत्रातही तपासणी

धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात दररोज रात्री एकदा आणि दिवसा दोनवेळा बोटींच्या साहाय्याने पेट्रोलिंग व तपासणी केली जाते. जलाशयाच्या पुढील भागात पाण्याचा अभाव असल्यामुळे खालच्या भागातही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची दर तासाला पीएसआय स्तरावरील अधिकारी पाहणी करतात. केएसआयएसएफच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यालयाबाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चार धरणांची सुरक्षा वाढवली : हिडकल-राकसकोप जलाशयांवर पोलिसांचा पहारा

भारत व पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती व त्या पार्श्वभूमीवरील वाढता तणाव लक्षात घेऊन बेळगावसह राज्यातील धरणांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील चार प्रमुख जलाशयांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम, सौंदत्ती तालुक्यात असलेले नविलतीर्थ डॅम, शिरुर डॅम व राकसकोप डॅमवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शुक्रवारी यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिडकल डॅमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. खबरदारी म्हणून जलाशयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून या परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. हिडकल व राकसकोप जलाशयातून बेळगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article