Sangli : सांगली–मिरज–कुपवाडमध्ये हायअलर्ट! हुल्लडबाजांवर पोलिसांचा दणका बसणार!
सांगलीत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची मोहिम
सांगली : जिल्हयात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत तरूण भारतने जिल्हा पोलीस प्रुमखांना आता तरी लक्ष घालावे म्हणून केलेल्या आवाहनानांतर आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घेतलेल्या झाडाझडतीनंतर सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील झुंडशाही मोडण्यासाठी अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या झुंडशाहीला ठोकून काढत कायद्याचा धाक निर्माण केला जाणार आहे. डार्क स्पॉटवरील नशेखोर आणि हुल्लबाजांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांसह एलसीबी, विशेष शाखा, राखीव दल, जलद कृती दलाचा समावेश राहणार आहे. घरात घुसून उत्तम मोहिते याचा खून करण्यात आला. त्यानंतर काल कुपवाड परिसरात सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना घडली. फाळकुटदादांसह सराईत गुन्हेगारांचा शहरात बाबर सुरू आहे. गत वर्षीच्या तुलनेत गुन्हेगारी कमी असली तरी सलग झालेल्या घटनांमुळे संतापाची लाट आहे. सुरक्षित सांगलीसाठी आता अधीक्षक घुगे यांनी हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माहिती संकलित केली. त्यांनतर मोहीम हाती घेतली आहे.
आज उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील आठ पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आज सकाळपासून अधीक्षकांनी सारी माहिती जाणून घेतली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या त्यानंतर आजपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली-मिरजेत पुढील काही दिवस ही मोहीम राबबली जाणार आहे. यात गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी, ओपनबार, नशेखोरांचा डार्क स्पॉट हेरले जाणार आहेत. त्याठिकाणी पोलिसांचा ठिय्या मारला जाणार आहे. त्याठिकाणी असा कोणी दिसून आल्यास दंडूका उगारला जाणार आहे. याची सुरूवातच आजपासून करण्यात आली आहे.