तुरुंगात कैद गँगस्टर्सचे हायटेक नेटवर्क
ड्रोनने मागवत आहेत शस्त्र अन् अमली पदार्थ
ब्रिटनमधील दोन प्रमुख हायसिक्युरिटी युक्त तुरुंगांमध्ये कैद गँगस्टर स्वत:च्या नेटवर्कचा वापर करत ड्रोनद्वारे तुरुंगात शस्त्रं अन् अमली पदार्थ मागवत आहेत. याचा खुलासा एका तुरुंग सुरक्षा अधिकाऱ्याने स्वत:च्या अहवालात केला आहे. पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी दोन उच्चसुरक्षा प्राप्त तुरुंगावरील हवाईसीमेला संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या हवाली केल्याचे तुरुंग निरीक्षण प्रमुख चार्ली टेलर यांनी म्हटले आहे.
एचएमपी मँचेस्टर आणि वॉर्सेस्टरशायरच्या एचएमपी लॉन्ग लॉर्टिनमध्ये अमली पदार्थ, शस्त्रं, मोबाइल आण टेकअवे खाद्यपदार्थ देखील ड्रोनच्या माध्यमातून पोहोचविले जात आहेत. स्टाफ आणि कैद्यांच्या सुरक्षेसाठी हे धोकादायक आहे. पोलीस आणि तुरुंग सेवने संघटित गुन्हेगारी टोळ्यांना या उच्चसुरक्षाप्राप्त तुरुंगाच्या वरील हवाई सीमेत ड्रोन उडविण्याची अनुमती दिल्याने हे अत्यंत चिंताजनक असल्याचे टेलर यांनी म्हटले आहे.
मँचेस्टर तुरुंगात अमली पदार्थ, शस्त्रं आणि मोबाइलसोबत टेकअवे खाद्यपदार्थ देखील ड्रोनच्या माध्यमातून कैद्यांपर्यंत पोहोचत आहेत. संघटित गुन्हेगारी टोळ्या या कारवाया संचालित कर तआहेत. मागील वर्षी तुरुंगात 220 ड्रोन उड्डाणं दिसून आली आहेत.
ड्रोन रोखण्यासाठी लावण्यात आलेले सुरक्षात्मक जाळे आणि सीसीटीव्ही सारखी मूलभूत सुरक्षा व्यवसथा बिघडली असल्याचे निरीक्षकांना आढळून आले. कैदी सुरक्षित खिडक्यांमध्ये छिद्र पाडून ड्रोनद्वारे दररोज अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा प्राप्त करत होते. काही प्रकरणांमध्ये तस्करीची सामग्री गवतात गुंडाळून झुडूपांमध्ये फेकण्यात आली होती, जी नंतर कैद्यांनी उचलली. तुरुंगात मूलभूम काम म्हणजेच गवत कापणे आणि कचरा उचलणे देखी या समस्येवर तोडगा काढण्यास मदत करू शकते असे टेलर यांचे सांगणे आहे.
बहुतांश कैदी ड्रग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह
मँचेस्टर तुरुंगात चारपैकी जवळपास एक कैदी अनिवार्य ड्रग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या तुरुंगात सुरक्षा वाढविणे आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची घोषणा नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती. सरकारने संकटग्रस्त तुरुंग प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तुरुंग सुरक्षा आणि देखभालीकरता आम्ही गुंतवणूक करत आहोत असा दावा न्याय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला आहे.