विंडीज वनडे संघात हेटमायरचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी विंडीजने संघाची घोषणा केली असून डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरचे विंडीज संघात पुनरागमन झाले आहे.
गेल्या वर्षीच्या अखेरीस हेटमायरने इंग्लंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. पण या 27 वर्षीय खेळाडूचा 15 जणांच्या संघात स्थान मिळाले आहे. अॅलिक अॅथनेझच्या जागी त्याची थेट निवड करण्यात आली आहे. शाय होपकडेच या संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून 17 वर्षीय युवा खेळाडू ज्युवेल अँड्य्रूला आणखी एक संधी देण्यात आली आहे. लंकेविरुद्ध त्याने पदार्पण केले होते. 31 ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर रोजी येथे या मालिकेची सुरुवात होईल. 6 नोव्हेंबर रोजी बार्बाडोस येथे शेवटचा सामना होईल. डरेन सॅमी या संघाचे प्रशिक्षक आहेत.
वनडे मालिकेसाठी निवडलेला विंडीज संघ : शाय होप (कर्णधार), ज्युवेल अँड्य्रू, केसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, हेटमायर, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, एव्हिन लेविस, गुडाकेश मोती, शेरफेन रुदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमारिओ शेफर्ड, हेडेन वॉल्श ज्युनियर.