For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेस्कॉमचा सर्व्हर दहा दिवसांनंतरही बंदच

10:01 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेस्कॉमचा सर्व्हर दहा दिवसांनंतरही बंदच
Advertisement

नवीन कनेक्शनसाठी दिरंगाई : बिल भरणाही ठप्प, कार्यालयात शुकशुकाट

Advertisement

बेळगाव : हेस्कॉमच्या सर्व्हरमध्ये दुरुस्ती असल्याने मंगळवार दि. 19 पर्यंत सर्व्हर बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले होते. परंतु, दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप सर्व्हरची दुरुस्ती झालेली नसल्याने शुक्रवारीही नवीन कनेक्शनसाठी ग्राहक ताटकळत होते. परंतु, सर्व्हरच नसल्याने ग्राहकांना पुन्हा माघारी फिरावे लागले आहे. राज्यात हेस्कॉमसह सर्वच वीज वितरण कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये दुरुस्ती करण्यात येणार असल्याने दहा दिवस सर्व्हर बंद ठेवण्यात आला होता. 13 ते 19 मार्च या दरम्यान सर्व्हर बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सर्व्हर बंद असल्याने रोख बिल भरणाव्यतिरिक्त इतर सर्वच कामे ठप्प होती. नवीन कनेक्शन, लोड वाढवून अथवा कमी करून घेणे, नावामध्ये बदल यासह इतर कामे पूर्णपणे ठप्प झाली होती.

नागरिकांमधून संताप

Advertisement

हेस्कॉमच्या म्हणण्यानुसार बुधवार दि. 20 पासून सर्व्हर सुरळीत होणे गरजेचे होते. परंतु, शुक्रवारी देखील सर्व्हर सुरळीत न झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. दहा दिवस उलटले तरी सर्व्हर बंदच असल्याने नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले आहे. हेस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुढीपाडवा काही दिवसांवर आल्याने नवीन घरांचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. परंतु, विद्युत कनेक्शन मिळत नसल्याने हेस्कॉम कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. केवळ रोख बिल भरणा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. धनादेशाद्वारे बिल भरणाऱ्या नागरिकांनाही अजून काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सर्व्हरची दुरुस्ती नेमकी केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :

.