For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेस्कॉमच्या ऑनलाईन सेवा तीन दिवस बंद राहणार

11:22 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
हेस्कॉमच्या ऑनलाईन सेवा तीन दिवस बंद राहणार
Advertisement

बेळगाव : हेस्कॉमच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याने दि. 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान हेस्कॉमच्या सर्व ऑनलाईन सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. यामुळे बिल भरण्यासह हेस्कॉममधील अंतर्गत कामकाज ठप्प होणार आहे. यामुळे नागरिकांनी याची दखल घेत सोमवारनंतर बिल भरण्यासाठी हेस्कॉममध्ये यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील विद्युत विभागाला सर्व्हर पुरविण्याचे काम इन्फोसिसकडे देण्यात आले होते. या कंपनीसोबतचे कंत्राट संपून वर्ष उलटले तरी हेस्कॉमने नवीन कंपनीकडे कंत्राट दिलेले नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून आहे त्या परिस्थितीमध्ये सर्व्हर चालविले जात होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बेळगावमध्ये कोणत्याही ऑनलाईन सेवांसाठी दुपारनंतरच कार्यालयात यावे लागत होते. हेस्कॉमच्या एमडी भारती यांच्याकडेही सर्व्हरच्या बिघाडाबाबत बेळगावमधील नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. सर्व्हरमध्ये तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याने दि. 24 ते 26 दरम्यान सर्व्हर बंद राहणार आहे. सर्व्हरवर आधारित हेस्कॉमच्या सर्व ऑनलाईन सेवा यामुळे ठप्प राहतील. सध्या सर्वच कामकाज सर्व्हरवर अवलंबून असल्याने तीन दिवस नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. यातील दोन दिवस चौथा शनिवार व रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने तितकासा परिणाम जाणवणार नसल्याचे हेस्कॉमचे म्हणणे आहे.

Advertisement

बिल भरण्यासह इतर सेवाही बंद

सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती केली जाणार असल्याने दि. 24 ते 26 दरम्यान ऑनलाईन सेवा बंद राहणार आहेत. यामुळे बिल भरणे, नवीन कनेक्शन यासह इतर सेवा बंद राहणार आहेत.

Advertisement

-विनोद करुर, साहाय्यक कार्यकारी अभियंते

Advertisement
Tags :

.