महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुतात्मा चौकात हेस्कॉमचा फिडर पिलर बॉक्स कोसळला

10:49 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इमारत बांधकामावेळी लागला धक्का

Advertisement

बेळगाव : हुतात्मा चौक येथे इमारतीच्या बांधकामावेळी हेस्कॉमच्या फिडर पिलर बॉक्सला धक्का लागल्याने तो कोसळला. 11 केव्ही क्षमतेचा विद्युतपुरवठा या वाहिन्यांमधून होत असल्याने थोडक्यात अनर्थ टळला. त्यामुळे बांधकाम करताना विद्युत वाहिन्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हुतात्मा चौक, मारुती गल्ली कॉर्नरवर एका अपार्टमेंटचे काम सुरू आहे. अपार्टमेंटच्या समोरून 11 केव्ही भूमिगत विद्युतवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. या विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देण्यासाठी ठिकठिकाणी फिडर पिलर बॉक्स उभारण्यात आले आहेत. फिडर पिलर बॉक्सशेजारी कोणतेही काम करताना हेस्कॉमची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु, बांधकाम करताना पूर्वपरवानगी न घेताच काम करण्यात येत होते. बांधकामावेळी धक्का लागल्याने फिडर पिलर बॉक्स कोसळला. उच्चविद्युत वाहिन्या असल्याने धोका होता. परंतु, तो थोडक्यात निभावला. त्यामुळे असे प्रकार यापुढे होणार नाहीत, याची काळजी प्रत्येकानेच घेणे गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article