महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

क्रॅक चित्रपटात नायिकेची व्यक्तिरेखा

06:36 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोरा फतेही ही ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने अनेक आयटम साँग्सद्वारे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. परंतु नोरा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. नोरा ही विद्युत जामवालसोबत ‘क्रॅक’ या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. रॅप-अप शूटची अनेक छायाचित्रे अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. सेटवर अभिनेत्री बॉडीकॉन ड्रेस आणि डेनिम जॅकेट परिधान करून आहे. क्रॅकच्या पूर्ण टीमसोबत माझा अनुभव अत्यंत खस राहिला. मुख्य भूमिकेसाठी माझी निवड केल्याने आदित्य दत्त, विद्युत जामवाल आणि पूर्ण टीमचे आभार मानते. सेटवर मी बरेच काही शिकू शकले. हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्याची मी आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे तिने म्हटले आहे.

Advertisement

नोरा फतेहीने या चित्रपटाकरता जॅकलीन फर्नांडिसला रिप्लेस केले आहे. विद्युतसोबत प्रथम जॅकलीन मुख्य भूमिका साकारणार होती. परंतु काही कारणास्तव ही भूमिका नोराला मिळाली आहे. नोरा आणि जॅकलीन यांच्यात सुकेश चंद्रशेखर प्रकरणावरून वाद सुरू असल्याचे मानले जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article