येथे उघडपणे होते पती-पत्नीची विक्री
वधू-वरासाठी भरतो बाजार
आमच्या देशात युवक-युवती हे स्वत:च्या पसंतीने किवा कुटुंबीयांनी ठरविलेल्या व्यक्तीसोबत विवाह करत असतात. परंतु एका ठिकाणी पती-पत्नीची विक्री होते. तेथे जाऊन तुम्ही स्वत:च्या पसंतीनुसार स्वत:साठी पती किंवा पत्नीची निवड करू शकतात.
येथे केवळ युवती स्वत:साठी पती शोधण्यास येतात असे नाही तर युवक देखील पत्नीच्या शोधात पोहोचतात. वधू आणि वराचे कुटुंब देखील उपस्थित असते. ज्यात आईवडिलांपासून आजीआजोबांचा समावेश असतो. शांघाच्या वधू-वर बाजारातील एक व्हिडिओ हॅरी जगार्ड नावाच्या अमेरिकन युवकाने शेअर केला आहे. हॅरीने स्वत:साठी या बाजारात वधू शोधण्याचा प्रयत्न केला, याकरता त्याने स्थानिक इसमाचीही मदत घेतली. परंतु चिनी युवतींनी हॅरीसोबत विवाह करण्यास उत्सुकता दाखविली नसल्याचे व्हिडिओत दिसून येते.
येथे प्रत्येकाची पसंत करण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. येथे अनेक जण वधू आणि वराच्या शोधात येत असतात. चीनमधील हा बाजार अत्यंत अनोखा मानला जातो. येथे संबंधित व्यक्तींची पसंती देखील विचारात घेतली जाते.
लोक या व्हिडिओला मोठी पसंती देत आहेत. आतापर्यंत 1 कोटी 38 लाखाहून अधिक ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. तर 3 लाख लोकांहून अधिक जणांनी याला लाइक केले आहे. युवतीने अमेरिकन युवकाला का नकार दिला अशी विचारणा एका युजरने केली आहे.