For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ती’चे मत लाखमोलाचे

06:01 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ती’चे मत लाखमोलाचे
Advertisement

मतदार नोंदणीत महिलांची आघाडी

Advertisement

लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. राजकीय पक्षांनी आपली आयुधे परजली आहेत. पक्षप्रवेश घडत आहेत. निवडणूक आयोगाने यंदा मतदारवाढीच्या दृष्टीने केलेल्या प्रबोधनात्मक चळवळीला यश आले आहे. नव्याने 2.63 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात पुरुष मतदारांच्या (1.22 कोटी) तुलनेत महिला (1.41 कोटी) मतदारसंख्या अधिक आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 पर्यंतच्या नोंदणीपर्यंतची देशातील मतदारसंख्या नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तब्बल 96.88 कोटी मतदार राज्यकर्त्यांचे भवितव्य ठरविणार आहेत. निवडणूक आयोगाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदारांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि आसाममधील मतदारांची गणतीही पूर्ण केली आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील महिला मतदारसंख्येतील वाढ लक्षणीय आहे. एकूण नोंदणी झालेल्या 2.63 कोटी नवमतदारांपैकी 1.41 कोटी महिला मतदार आहेत. तर पुरुष नवमतदारांची संख्या 1.22 कोटी एवढी आहे. 2023 मध्ये एक हजार पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची संख्या 940 होती. ती 2024 मध्ये 948 झाली आहे.

युवा मतदारांची लक्षणीय वाढ

नव्या यादीनुसार देशात 18-19 आणि 20-29 या वयोगटातील युवा मतदारांची संख्या दोन कोटीहून अधिक वाढली आहे. निवडणूक आयोगाने युवा मतदारांच्या नोंदणीसाठी देशभरात खास मोहीम आखली होती. युवकांचे देश उभारणीत योगदान असावे, या हेतूने ही नोंदणी हाती घेण्यात आली. त्यासाठी मतदारसंघनिहाय खास सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नेमण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन प्रबोधन करण्यात आले होते. त्या मोहिमेचा हेतू साध्य होऊन युवा मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

दिव्यांग मतदारांनाही मतदार प्रक्रियेत भाग घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार मतदारयादीत एकूण 88.38 लाख दिव्यांग मतदार आहेत.

मतदार नोंदणीसाठी वयाची 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक असतो. मात्र, निवडणूक आयोगाने 17 वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांची पूर्वनोंदणी केली. त्यासाठी जवळपास 10.64 लाख एवढे अर्ज आले. त्यानुसार 1 एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या अहर्ता दिनांकावर त्यांना समाविष्ट करून घेतले जाईल.

 मतदारांची पडताळणी

मृत, दुबार, बाहेरगावी गेलेले अशा मतदारांची माहिती या मोहिमेदरम्यान घेण्यात आली. त्यानुसार 1 कोटी 65 लाख 76 हजार 654 मतदार कमी झाले. यात कायमस्वरुपी स्थलांतर, दुबार नावे कमी करण्यात आले. यात 67 लाख 82 हजार 642 एवढे मयत मतदार वगळण्यात आले. 75 लाख 11 हजार 128 मतदार स्थलांतरित झाले किंवा नमूद पत्त्यावर आढळले नाहीत. तर 22 लाख 5 हजार 685 एवढ्या डुप्लिकेट मतदारांची नावे वगळण्यात आली. आदिवासीबहुल विभागातही मतदार नोंदणी 100 टक्के पूर्ण करण्यात आली.

वर्गीकरण                                         मतदारसंख्या

एकूण मतदार                                 96,88,21,926

पुरुष मतदार                                   49,72,31,994

महिला मतदार                               47,15,41,888

तृतीयपंथी मतदार                                    48,044

दिव्यांग मतदार                             88,35,449

18-19 वयोगट मतदार                              1,84,81,610

20-29 वयोगट                                19,74,37,160

80 वयोगटावरील मतदार                       1,85,92,918

शंभरी ओलांडलेले मतदार                       2,38,791

वर्गीकरण                         आसाम              जम्मू-काश्मीर

एकूण मतदार                     2,43,01,960        86,94,992

पुरुष मतदार                       1,21,79,358        44,35,750

महिला मतदार                   1,21,22,188          42,59,082

तृतीयपंथी मतदार                        414                 160

मतदार : लोकसंख्या प्रमाण       63.67 टक्के      59.64 टक्के

लिंग गुणोत्तर प्रमाण                     995                 960

पुरुष मतदार आकडेवारी 2019 ते 2024

2019               46.47 कोटी

2020              47.5 कोटी

2021               48.29 कोटी

2022              48.99 कोटी

2023              48.89 कोटी

2024              49.72 कोटी

महिला मतदार आकडेवारी 2019 ते 2024

2019               43.13 कोटी

2020              44.27 कोटी

2021               45.15 कोटी

2022              46.04 कोटी

2023              45.97 कोटी

2024              47.15 कोटी

युवा मतदार आकडेवारी 2019-2024

2019               1.50 कोटी

2020              1.56 कोटी

2021               1.24 कोटी

2022              1.34 कोटी

2023              1.32 कोटी

2024              1.85 कोटी

(आकडे कोटीमध्ये)

लोकसभा निवडणूक         मतदार          पुरुष मतदार           महिला मतदार

2019                                 89.6             46.5               43.1

2024                                96.8              49.7               47.1

मतदारसंख्या 18-19 वयोगट

2019                  1.50 कोटी

2024                1.85 कोटी

 मागील निवडणुकीत 91.19 कोटी मतदार

2019 च्या लोकसभा निवडणुकीत (सर्व्हिस व्होटर्ससह) 91 कोटी 19 लाख 50 हजार 734 मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी 47 कोटी 33 लाख 73 हजार 748 पुरुष मतदार, 43 कोटी 85 लाख 37 हजार 911 महिला मतदार तर 39 हजार 75 अन्य मतदार होते. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 31 कोटी 72 लाख 46 हजार 297, महिला 29 कोटी 46 लाख 24 हजार 323 तर अन्य 5 हजार 721 अशी एवढी होती. एकूण 61 कोटी 18 लाख 76 हजार 971 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 67.1 टक्के होती.

‘नोटा’ 65 लाखांवर

2019 च्या निवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या एकूण मतदानापैकी ग्राह्या मतांची संख्या 60 कोटी 53 लाख 72 हजार 886 होती. तर ग्राह्या पोस्टल मते 22 लाख 77 हजार 165 एवढी होती. ईव्हीएमवर नोंदल्या गेलेल्या एकूण ‘नोटा’ची संख्या 65 लाख 500 एवढी होती. तर पोस्टल मतांमध्ये ‘नोटा’ची संख्या 22 हजार 272 होती.

आठ हजार उमेदवार होते रिंगणात

2019 च्या निवडणुकीत एकूण 8 हजार 54 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पुरुष 7 हजार 322, महिला 726, अन्य 6 होते. त्यापैकी विजयी उमेदवार पुरुष 465, महिला 78 होत्या. 6 हजार 923 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यात पुरुष उमेदवार 6 हजार 342 होते. तर महिला उमेदवार 575, अन्य 6 होते.

संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी

Advertisement
Tags :

.