महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेम्प, अॅडॅम्स बांगलादेशचे फलंदाज, गोलंदाज प्रशिक्षक

06:39 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेश क्रिकेट मंडळाने पुरुष राष्ट्रीय संघासाठी दोन नव्या नियुक्त्या केल्या असून डेव्हिड हम्प यांची फलंदाज प्रशिक्षक तर आंद्रे अॅडॅम्स यांनी गोलंदाज प्रशिक्षकपदी त्यांनी निवड केली आहे.

Advertisement

बांगलादेशची मायदेशात लंकेविरुद्ध मालिका होणार असून बीसीबीने दोघांशी दोन वर्षांचा करार केला आहे. हेम्प यांनी याआधी मे 2023 पासून हाय परफॉर्मन्स मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. या नव्या भूमिकेत त्यांचा अनुभव लंकन संघाला उपयुक्त ठरणार आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी बांगलादेश संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. प्रथमश्रेणी क्रिकेटचा त्यांना मोठा अनुभव असून त्यांनी 15500 हून अधिक धावा जमविल्या आहेत.

न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू आंद्रे अॅडॅम्स यांनी गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतली असून यापूर्वी न्यूझीलंडसाठी त्यांनी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय 2022-23 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेवळी ते ऑस्ट्रेलियन संघाचे सहायक प्रशिक्षकही होते. मार्च 2024 मध्ये बांगलादेश-लंका यांच्यात मालिका होत असून त्याच्या तयारीला त्यांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. लंका संघ बांगलादेशमध्ये येणार असून तिन्ही प्रकारच्या मालिका दोन्ही संघांत होणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article