For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेमंत सोरेन यांचा जामीन अर्ज फेटाळला

06:09 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेमंत सोरेन यांचा जामीन अर्ज फेटाळला
Advertisement

काकांच्या श्राद्धविधीला जाण्यास सशर्थ अनुमती

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. सोरेन यांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. यावेळी अटकेची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट करतानाच तात्पुरता जामीन मंजूर करण्यासही नकार दर्शवला. मात्र, हेमंत सोरेन यांना 6 मे रोजी त्यांच्या काकांच्या श्राद्धविधीला उपस्थित राहण्यास सूट दिली. आदेशानुसार, हेमंत सोरेन हे 6 मे रोजी पोलीस बंदोबस्तात आपल्या काकांच्या श्राद्धविधीला उपस्थित राहणार असून श्राद्धविधीनंतर पुन्हा कोठडीत परतणार आहेत. या काळात त्यांना कोणत्याही प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

हेमंत सोरेन यांच्यावतीने अटक आणि ईडी रिमांडला आव्हान देणाऱ्या फौजदारी रिट याचिकेवरील निर्णय 28 फेब्रुवारी रोजी राखून ठेवण्यात आला होता. त्यावर न्यायालयाचा निर्णय शुक्रवारी आला. या याचिकेत त्यांच्या अटकेच्या आणि रिमांडच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. तसेच हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामिनाच्या मागणीवर झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय दिला.

Advertisement
Tags :

.