महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेमंत सोरेन सरकारकडून बहुमत सिद्ध

04:05 PM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समर्थनार्थ 45 मते : राज्यात दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

झारखंड विधानसभेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बहुमत सिद्ध केले आहे. 81 सदस्यीय विधानसभेत त्यांनी विश्वासमत प्राप्त केले असून त्यांच्या समर्थनार्थ 45 आमदारांनी मतदान केले आहे. तर विरोधात एकही मत पडलेले नाही. झारखंड विधानसभेत सद्यकाळात 76 आमदार आहेत. सत्तारुढ झामुमो-काँग्रेस-राजद आघाडीने 3 जुलै रोजी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता, तेव्हा राज्यपालांना 44 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सोपविली होती.

विधानसभेत बहुमत चाचणीवेळी विरोधी पक्षाचे आमदार घोषणाबाजी करत होते. जे लोक घोषणा देत आहेत, त्यांच्यापैकी निम्मे सदस्य निवडणुकीनंतर विधानसभेत परत येणार नाहीत. झारखंडमध्ये भाजपचे ऑपरेशन कमळ पूर्णपणे फसले आहे. आमचे लोक आमच्यासोबत राहिल्याचा दावा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेत बोलताना केला आहे.

भाजपकडे कुठलीच विचारसरणी किंवा अजेंडा नाही. केवळ त्याच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. भाजपने राज्यात आमदारांच्या घोडेबाजाराचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आता राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही पराभवाला तोंड देणार असल्याची टीका हेमंत सोरेन यांनी केली आहे. तर भाजपने सोरेन यांनी केलेले आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे.

हेमंत सोरेन यांनी यादरम्यान माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे आभार मानले आहेत. चंपई सोरेन यांनी निर्भिडपणे सरकार चालवत सरकार वाचविले आहे. भाजपकडून या काळात आमदारांच्या घोडेबाजाराचा प्रयत्न सुरु होता असे हेमंत यांनी म्हटले आहे. हेमंत सोरेन हे तुरुंगात गेल्यावर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यावर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन हे 28 जून रोजी तुरुंगातून बाहेर पडले होते. झारखंड उच्च न्यायालयाने कथित भूखंड घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हेमंत यांना जामीन मंजूर केला होता. तर ईडीकडून 31 जानेवारी रोजी अटक होण्याच्या काही वेळ अगोदर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर पडत पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने झारखंडमधील राजकीय स्थिती बऱ्याचअंशी बदलली आहे. तर दुसरीकडे हेमंत सोरेन यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. हेमंत सोरेन यांना जामीन देताना उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्याने भाजपचा उत्साह वाढला आहे. झारखंडमध्ये येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. झारखंडमध्ये भाजपचे नेतृत्व सध्या बाबुलाल मरांडी यांच्याकडे आहे.

मंत्र्यांचा शपथविधी

विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यावर हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री असलेले चंपई सोरेन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस आमदार रामेश्वर उरांव, राजदचे सत्यानंद भोक्ता, झामुमोचे वैद्यनाथ राम, दीपक बारुआ, काँग्रेसचे बन्ना गुप्ता, इरफान अंसारी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Advertisement
Tags :
#floor test#Jharkhand CM Hemant Soren#Political#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article