For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिशा फाउंडेशनतर्फे शितल शेळके यांना मदतीचा हात

04:09 PM Dec 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
दिशा फाउंडेशनतर्फे शितल शेळके यांना मदतीचा हात
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

आंबेगाव -सटवाडी, ता सावंतवाडी येथील सौ. शीतल विठ्ठल शेळके, वय- वर्ष 36 या गेल्या सहा महिन्यापासून गर्भपिशवीच्या कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहेत . आत्तापर्यंत त्यांच्यावर लहान शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. सौ. शेळके यांच्या पुढील दोन शस्त्रक्रियेसाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे सौ. शितल शेळके आणि त्यांचे पती मोलमजुरी करून घरखर्च भागवतात. त्यांना इयत्ता तिसरी व चौथीत शिकणारी अशी दोन मुलं आहेत. त्यांच्याकडे जमीन अथवा शेती सारख्या इतर उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीत त्यांना सहा महिन्यापूर्वी गर्भपिशवीचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी शेळके कुटुंबीयांनी कोल्हापूर तसेच गोवा येथे चौकशी केली असता शस्त्रक्रियेसाठी पाच लाख खर्च येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आणि सदरची शस्त्रक्रिया तात्काळ करावी अन्यथा तो आजार वाढू शकतो असे डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात आलेले आहे.शेळके कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारा पाच लाखांचा खर्च त्यांना करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना मदत करण्याचे आवाहन सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रातून केले होते . वरील सर्व परिस्थितीची माहिती वृत्तपत्रातून कळताच कलंबिस्त् हायस्कूल येथील 1993 – 1994 इयत्ता 10वी ची बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या दिशा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे सौ. शितल शेळके यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सौ. शितल शेळके यांना दिशा फाऊंडेशनच्या वतीने तातडीची मदत दिल्यास त्यांना नवसंजीवनी मिळू शकते व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलवण्यास मदत होऊ शकते या उद्दात्त् हेतूने 10,000/- (दहा हजार ) रुपयांचा धनादेश नुकताच बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्त करण्यात आला. यावेळी दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सावंत, सेक्रेटरी दीपक राऊळ, सह सेक्रेटरी सुषमा सावंत, खजिनदार प्रवीण कुडतरकर, सदस्य कल्पना सावंत आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.