महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जायंट्सतर्फे धनगरवाड्यावर मदत

11:32 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जायंट्स सखीने बेळगावपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यातील कोदाळी धनगरवाड्यातील कुटुंबांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी जायंट्स सखीतर्फे तेथील कुटुंबीयांना फराळ, साड्या, वेगवेगळे पोशाख, आकाशकंदील, दिवे, उटणे, तेल, साबण आदी साहित्य देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी जायंट्स सखीच्या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. दीपा पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी नम्रता महागावकर, विद्या सरनोबत, स्वाती फडके, दीपा मुतकेकर, वैशाली भातकांडे, अर्चना कंग्राळकर, ज्योती पवार, प्रिया बांदिवडेकर, हेमा सांबरेकर, राहुल पाटील उपस्थित होते. धनश्री सांबरेकर यांनीसुद्धा या कुटुंबीयांना साड्या व कपडे दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article