For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मा नमस्ते

06:49 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आत्मा नमस्ते
Advertisement

नमस्ते! हा भारतीय उपखंडातील हिंदूंकडून उगम पावलेला एक सामान्य बोलला जाणारा शब्द अभिवादन करताना वापरतात. जेव्हा व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांना अभिवादन करणे आणि त्यांच्या विभक्त होण्यावर नमस्ते म्हणणे ही एक प्रथा आहे. नमस्ते किंवा नमस्कार हे कुणालाही भेटल्यावर अगदी सहजपणे आपल्या ओठावर येतं. एखाद्याला अभिवादन करणे आपल्याला वेगळं शिकवावं लागतं नाही. अगदी लहानपणापासूनच आपण आपल्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला आपले पालक अभिवादन करताना बघत असतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा संवाद साधायला यायला लागतो तेव्हा आपण कुठल्याही संवादाची सुरुवात ही नमस्कार किंवा नमस्ते यानेच करतो. नमस्काराची एक विशिष्ठ मुद्रा देखील आहे.

Advertisement

जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी बोलले जाते तेव्हा सामान्यत: हातांनी एकत्र दाबलेले, तळवे स्पर्श करून आणि छातीच्या समोर बोटांनी वरच्या दिशेने बनवलेले थोडेसे धनुष्य असते. हा हावभाव, ज्याला अंजली मुद्रा किंवा प्रणामासन म्हणतात, ते शब्दशून्यपणे देखील केले जाऊ शकते आणि त्याचा समान अर्थ आहे.

हावभाव नमस्ते हा विश्वास दर्शवतो की आपल्या प्रत्येकामध्ये एक दैवी स्पार्क आहे जी हृदय चक्रात स्थित आहे. हावभाव म्हणजे एका आत्म्याने दुसऱ्यामध्ये आत्म्याची पावती आहे. संस्कृतमध्ये नम: + ते = नमस्ते (देवनागरी/हिंदी: नम: + ते = नमस्ते) हा शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘मी तुला नमन करतो’ - तुला माझा नमस्कार, नमस्कार किंवा साष्टांग नमस्कार.

Advertisement

प्राणिक हीलिंग या पूरक उपचार पद्धतीमध्ये हीलर्स म्हणजेच उपचार देणारे जेव्हा रोजच्या जीवनात कधीही एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांना “आत्मा नमस्ते” असं म्हणून अभिवादन करतात. असं का म्हणत असतील बरं???

त्याचं उत्तर असं आहे की मास्टर चोआ कोक सुई यांनी प्राणिक हीलिंगच्या प्रत्येक अभ्यासक्रमातून समोरच्याला माणूस म्हणून न बघता त्या शरीरामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो म्हणून बघा असे म्हटले आहे. नमस्कार (देवनागरी/हिंदी: नमस्कार) चा शाब्दिक अर्थ आहे “मी (तुझ्या) रूपाला नमन करतो”.

‘आत्मा नमस्ते’ हा वाक्प्रचार व्यक्तीच्या ‘उच्च’ आत्म्याला संबोधित करतो: ‘उच्च आत्म्याला’, मी तुमच्या आतल्या स्थानाचा आदर करतो जिथे विश्व राहतं. मी तुमच्यातील प्रेम, प्रकाश आणि सत्याचा सन्मान करतो. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असता आणि मी त्या ठिकाणी असतो तेव्हा आपण एक असतो. हा सराव तुम्ही तुमच्या हृदयावर प्रार्थनेच्या स्थितीत हात ठेवून सुरू करा. दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर 6 ते 8 इंच बघा आणि आत्मा, नमस्ते म्हणा. मग, त्यांच्या डोळ्यात पहा (तुम्ही आरशात तुमच्या स्वत:च्या डोळ्यात देखील पाहू शकता). खरोखर पहा, आणि प्रतीक्षा करा. तुमच्याकडे काय परत येते ते पहा. तुम्ही प्रेमात पडता का? हा एक तीव्र सराव आहे; ते काहींसाठी राखून ठेवू नका. आत्मा नमस्ते! ‘आत्मा’ म्हणजे संस्कृतमध्ये आत्मा. ‘नमस्ते’ - मी तुमच्यातील देवत्वाला नमस्कार करतो, तुमच्यातील आत्म्याला मी नमस्कार करतो, मी तुमच्या आत असलेल्या ‘मी आहे’ च्या उपस्थितीला सलाम करतो!

समोरच्या शरीरातील आत्म्याला वंदन करणे हा अभिवादनाचा एक फार वेगळा प्रकार प्राणिक हीलिंग या विद्येमार्फत आपल्याला कळतो. भौतिक शरीर कधीतरी नष्ट होणार आहे आणि त्या भौतिक शरीराचे सगळे लाड आपण पुरवत असतो. भौतिक शरीराला चांगले कपडे देणे, सुगंधी अत्तर देणे, चांगलं छान छान जेवण देणे या सगळ्या गोष्टी करत असताना त्या भौतिक शरीराच्या आतील आत्म्याला कशाची गरज आहे .....काय केल्यावर त्या आत्म्याला आनंद मिळणार आहे हा विचार आपण कधीच करत नाही. प्रत्येक भौतिक शरीर हे आजूबाजूच्या परिस्थितीने त्रासलेलं आहे पण त्या शरीरातील आत्मा कुठेतरी शांत होण्याची जागा शोधतोय. कोणीतरी आपल्याला ओळखावे, आपल्याला हाक मारावी याची वाट पाहतो आहे, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आत्म्याला अभिवादन करणे याचा सराव करणे, याचे फार वेगळे, चांगले परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर दिसतात. रोज सकाळी स्वत:ला आरशात पाहताना बाहेर जाताना, तयार होताना जेव्हा स्वत:च्या डोळ्यात बघून तुम्ही आत्मा नमस्ते म्हणणार आहात तेव्हा तुम्हाला किती जास्त आनंद मिळतो याचे निरीक्षण करा. अचानक तुमच्या हृदयात खूप प्रेमळ भावना जागृत होताना तुम्हाला दिसेल. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला ते भौतिक शरीर नसून त्या शरीराच्या आतमध्ये एक पवित्र आत्मा आहे अशा नजरेने पाहतो तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तींकडून होणारे जे मानसिक त्रास आहेत ते आपोआप कमी होतात. मागील काही लेखात सोल याविषयी लिहिताना सांगितल्याप्रमाणे एखादी व्यक्ती वयाने खूप मोठी असते पण तिचं वागणं अगदी लहान बाळासारखं असतं ...निर्णय क्षमता नसते ...त्या उलट एखादं दहा वर्षाचा बाळ सुद्धा मोठ्या लोकांसारख्या समजूतीच्या गोष्टी करत...त्यांच्यातील हा फरक त्या भौतिक शरीरातील आत्म्याचा आहे.

ज्या आत्म्याने या पृथ्वीतलावर वारंवार जन्म घेतलाय जो आत्मा मोह, माया, मत्सर अशा सगळ्या भावभावनांच्या पलीकडे गेलेला आहे. तो आत्मा जेव्हा पुन्हा पृथ्वीतलावर जन्म घेतो आणि एखाद्या शरीरात वावरतो तेव्हा त्या शरीराचं वय लहान आहे की मोठं आहे त्याने फरक पडत नाही कारण त्या भौतिक शरीराच्या आतल्या आत्म्याचं वय हे समोरच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. जेव्हा आत्मा या विषयाचा तुम्ही खोलवर अभ्यास करता तेव्हा भौतिक शरीरा पलीकडे एखाद्या माणसाला ओळखायला लागता...बघायला शिकता... तेव्हा या जगाकडे, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या अडचणींकडे, माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. त्यामुळे या लेखाच्या निमित्ताने आत्मा नमस्ते असे अभिवादन तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना करून बघा आणि तुमच्यात झालेला बदल आम्हाला नक्की कळवा.

आज्ञा कोयंडे

Advertisement
Tags :

.