हेल प्लॅनेट तापमान २००० अंश
युनिव्हर्सिटी ऑफ जिनिव्हाच्या वैज्ञानिकांनी अशाप्रकारचा ग्रह शोधला आहे, ज्याची कुणी कल्पना देखील केली नव्हती. या ग्रहाचे नाव डब्ल्यूएएसपी-76बी आहे. येथील हवामान अत्यंत खराब आहे, येथे हवा असली तरी तिचा वेग अधिक आहे. हवेत लोहाच्या सुक्ष्म कणांचे प्रमाण अत्यंत अधिक आहे. दिवसा तेथे तापमान 2000 अंश सेल्सिअस असते.
हा ग्रह स्वत:च्या ताऱ्यासोबत टाइडली लॉक्ड आहे, म्हणजेच जोडलेला आहे. याचमुळे याच्या चहुबाजूला जोरदार वारे वाहत असतात. यात लोहाच्या कणांचे प्रमाण देखील अधिक आहे. येथील अधिक तापमानामुळे दिवसा लोहाचे कण वितळून या ग्रहाच्या पृष्ठभागावर पडत असतात. हा एक एक्स्पोप्लॅनेट आहे, म्हणजेच बाहेरील ग्रह. बाहेरील यासाठी कारण हा आमच्या सौरमंडळात नाही. 1990 पासून आतापर्यंत वैज्ञानिकांनी अशाप्रकारच्या 5200 बाहेरील ग्रहांचा शोध लावला आहे. यातील अनेक गुरु आणि शनिसारखे मोठे ग्रह आहेत. काही पृथ्वीसारखे ग्रह देखील आहेत. परंतु तेथे जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरण आहे की काही हे अद्याप समजू शकलेले नाही.
डब्ल्यूएएसपी-76बीने अलिकडेच अधिक लक्ष आकर्षित केले आहे. हा एक अल्ट्रा-हॉट गॅस प्लॅनेट आहे. आमच्या पृथ्वीपासून सुमारे 640 प्रकाशवर्षे अंतरावर हा ग्रह आहे. पायसेस नक्षत्रच्या दिशेने असलेल्या या ग्रहाचा शोध 2013 मध्ये झाला होता. तेव्हापासून याचे अध्ययन होत आहे. याची कक्षा स्वत:च्या ताऱ्याच्या अत्यंत नजीक आहे. हा स्वत:च्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिण 1.8 दिवसांत पूर्ण करतो.
लोहकणांच्या शोधामुळे नवी माहिती
याचा एक हिस्सा नेहमी प्रकाशात असतो. याचमुळे दिवसा येथे तापमान 2000 अंशावर जाते. लोहाचे कण हवेत तरंगत असतात. परंतु रात्री थंड तापमानात लोहाचे कण हवेतून जमिनीवर कोसळत असतात. अलिकडेच जिनिव्हा युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी लोहाच्या कणांचा शोध लावला आहे.