महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियात 22 जणांसह हेलिकॉप्टर बेपत्ता

06:06 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘एमआय-8टी’ला दुर्घटना : तलावात पडल्याची भीती

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

रशियाचे ‘एमआय-8टी’ हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान बेपत्ता झाले आहे. त्याचा अपघात होण्याची शक्मयता आहे. हेलिकॉप्टर बेपत्ता झाले तेव्हा त्यामध्ये तीन क्रू सदस्यांसह एकूण 22 जण होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरने कामचटका प्रदेशातील  निकोलायव्हका येथे पोहोचण्यासाठी उड्डाण केले होते, अशी माहिती रशियाच्या हवाई वाहतूक एजन्सीने दिली. तसेच आयआरएने सूत्रांच्या हवाल्याने हेलिकॉप्टर तलावात पडल्याचे सांगितले. ते मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथील पर्यटकांना घेऊन जात होते. हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या परिसरात रिमझिम पाऊस आणि धुके दिसत होते. त्यामुळेच हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टर तळावर परतणार होते. मात्र ते परतले नाही. क्रू मेंबर्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण काही उपयोग झाला नाही. बचाव कर्मचाऱ्यांनी बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध सुरू केला आहे. हेलिकॉप्टरच्या शोधासाठी दुसरे विमान पाठवण्यात आले आहे. ‘एमआय-8टी’ पूर्वीही अनेक अपघातांना बळी पडले आहे. या महिन्याच्या सुऊवातीला 16 जणांना घेऊन जाणाऱ्या ‘एमआय-8टी’ हेलिकॉप्टरला रशियाच्या पूर्वेकडील भागात अपघात झाला होता.

मॉस्कोपासून 6000 किमी दूर अपघात

कामचटका मॉस्कोच्या पूर्वेस 6,000 किमी आणि अलास्काच्या पश्चिमेस 2,000 किमी अंतरावर आहे. हा परिसर आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे येथे अनेक पर्यटक येतात. येथे सुमारे 160 ज्वालामुखी आहेत आणि त्यापैकी 29 अजूनही सक्रिय आहेत.

‘एमआय-8टी’ ही एमएलआय एमआय-8 हेलिकॉप्टरची सर्वाधिक वापरली जाणारी आवृत्ती आहे. हे प्रथम 60 च्या दशकात डिझाईन केले गेले होते. 1967 मध्ये रशियन सैन्यासाठी ते पहिल्यांदा वापरले गेले. त्याची किंमत 15 दशलक्ष डॉलर्स (125 कोटी ऊपये) आहे. ‘एमआय-8टी’ हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरपैकी एक आहे. रशियाने त्याची 17 हजारांहून अधिक युनिट्स बनवली आहेत. भारत, चीन, इराणसह 50 हून अधिक देश याचा वापर करतात. हे हेलिकॉप्टर नागरी आणि लष्करी दोन्हीमध्ये वापरले जाते. भारताने पहिल्यांदा 1971 मध्ये सोव्हिएत युनियन (रशिया) कडून एमआय-8 हेलिकॉप्टर खरेदी केले होते. भारताने 1971 ते 1988 दरम्यान 107 हेलिकॉप्टर खरेदी केली होती. मात्र, ती टप्प्याटप्प्याने सेवेतून कमी करण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article