महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

हेब्बाळकर - निंबाळकर यांना पुन्हा संधी

12:18 PM Mar 25, 2023 IST | Rohit Salunke

काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Advertisement

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची पहिली यादी आज शनिवारी सकाळी जाहिर करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तर खानापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहिर झाली आहे.

पक्षाचे सचीव मुकुल वासनिक यांनी सदर यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून तर सिद्धराम³या वरुणा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.

बेळगाव जिल्हय़ातील चिकोडी मतदारसंघातून गणेश हुक्केरी, कागवाडमधून भरमगौडा कागे, कुडची महेंद्र तमन्नावर, हुक्केरी ए. बी. पाटील, यमकनमर्डी सतीश जारकीहोळी, बैलहोंगल महांतेश कौजलगी व रामदुर्ग मतदारसंघातून अशोक पट्टण यांना संधी देण्यात आली आहे.

बेळगाव आणि उत्तर दक्षिणमध्ये मात्र नव्या उमेदवाराचा शोध घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना नवा उमेदवार मिळणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :
#announced#Congress candidates#Firstlist#of24#tarunbharat
Advertisement
Next Article