महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काशीमध्ये गंगेचे 30 घाट पाण्याखाली : बिहारमध्येही पूरस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास आठवडाभरापासून पूरस्थिती कायम आहे. पुराचा सर्वाधिक फटका गोरखपूरला बसला आहे. येथे राप्ती नदी धोक्मयाच्या चिन्हावरून वाहत आहे. आतापर्यंत 55 हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. येथील परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीएसीची पथके 100 बोटी तैनात करून मदतकार्यात गुंतली आहेत. गंगा नदीलाही उधाण आले आहे. वाराणसीतील गंगा नदीपात्रातील 30 घाट पुराच्या पाण्याने पूर्णपणे बुडाले आहेत. दशाश्वमेध घाटातील गंगा आरतीच्या ठिकाणी पाणी पोहोचले आहे. अस्सी घाटावरील पूर्वीचे आरती स्थळ बदलण्यात आले आहे. दुसरीकडे, नेपाळला लागून असलेल्या बिहारच्या भागात पूरस्थिती कायम आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे काही भागात लोकांचे स्थलांतरही केले जात आहे.

गुजरातमध्येही हाहाकार

गुजरातमधील पोरबंदरमध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना अग्निशमन दलाने वाचवले. शिमला आईस पॅक्टरी आणि रोकडिया हनुमान मंदिराजवळील भागात एक दिव्यांग जोडपे आणि इतर 13 लोकांना त्यांच्या पाण्याखाली गेलेल्या घरातून वाचवण्यात आले. हवामान खात्याने 13 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article