महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत पावसाने पाणी-पाणी

06:55 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्ते जलमय : वाहतुकीवर परिणाम : राजकीय नेत्यांच्या बंगल्यात घुसले पाणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली-एनसीआरमध्ये गुऊवार-शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पूरसदृशस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्याखाली गेली होती. रस्त्यांवर पाणीच-पाणी अनेक भागात वाहतुकीवर परिणाम झाला. पावसाचे पाणी साचल्याने यशोभूमी द्वारका सेक्टर 25 मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजेही बंद करण्यात आले होते.

दिल्लीत गुऊवारी सकाळी 8:30 ते शुक्रवारी सकाळी 8:30 पर्यंत म्हणजेच 24 तासात 228 मिमी पाऊस झाला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 येथील पिक-अप-ड्रॉप क्षेत्राचे छत आणि आधार खांब कोसळले. त्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. तसेच कारमध्ये बसलेल्या पॅब चालकाचा जागीच मृत्यू झाला.

‘व्हीआयपी’ही पाण्यात

दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पावसाने सामान्य लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले असतानाच लुटियन्स दिल्लीसह अनेक व्हीआयपी भागात पूर आला. लुटियन्स दिल्लीतील अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची निवासस्थाने पाण्याने भरली होती. पाणी साचल्याने शहरातील प्रमुख भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकसभेच्या अधिवेशनासाठी नेते आपापल्या निवासस्थानातून बाहेर पडले तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

लुटियन्स दिल्ली तुंबली

पावसामुळे काँग्रेस नेते शशी थरूर, खासदार मनीष तिवारी, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब, काँग्रेस खासदार तारिक अन्वर आणि दिल्लीचे मंत्री आतिशी यांची घरे पाण्याखाली गेली. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनीही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट  केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या निवासात भरलेले पाणी दिसत असून पाण्यात उतरून ते आपल्या कारकडे जाताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनाही संसदेत जाण्यात अडचणी आल्या. त्याच्या कर्मचाऱ्यांनी व इतरांनी त्याला उचलून गाडीपर्यंत नेऊन मदत केली. त्यांच्या निवासस्थानाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या घराभोवतीही पाणी साचले होते.

दुसरीकडे, हवामान खात्याने दिल्लीसह 24 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, बिहार, ओडिशा, गोवा, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अऊणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article