मुसळधार पावसाने बिहारमध्ये पूरस्थिती
विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर : मध्यप्रदेशात पावसाचा इशारा
वृत्तसंस्था/ पाटणा, इंदोर
बिहारमधील गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे बक्सर, भोजपूर, सारण, वैशाली, पाटणा, समस्तीपूर, बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, खगरिया, भागलपूर आणि कटिहारमधील बहुतांश भाग पुरामुळे प्रभावित झाला आहे. पुरामुळे मुंगेर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. गंगा या मुख्य नदीसोबतच कोसी, बुढी गंडक, गंडक, घाघरा, पुनपुन आणि सोन नद्यांची पाणीपातळी गेल्या तीन दिवसांपासून धोक्मयाच्या चिन्हावरून वाहत आहे.
देशातील 16 राज्यांमध्ये सोमवारी हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने 24 सप्टेंबर रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, अऊणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, कुठेही अतिवृष्टीचा इशारा दिला नसल्याने तूर्तास दिलासा व्यक्त केला जात आहे.
मध्यप्रदेशातील भोपाळ, इंदोर आणि जबलपूरमध्येही सोमवारी हलका पाऊस सुरू होता. तसेच मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाळ्यात आतापर्यंत 41.8 इंच पाऊस झाला आहे. काही राज्यांमध्ये पावसाचा दणका सुरू असला तरी काही भागात ऊन्हाचा कडाकाही वाढला आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोमवारी 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंद