राज्यात जोरदार पावसाची शक्यता
विशेष प्रतिनिधी/ पणजी
हवामान खात्याने जरी ऑरेंज अलर्ट शनिवारी जाहीर केला होता, तरी देखील पावसाचे प्रमाण मात्र मर्यादित राहिले. आजपासून पुढील चार दिवस गोव्यात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासांत गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. राज्यात सरासरी एक इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. धारबांदोडा येथे सव्वा दोन इंच, केपे दोन इंच, फोंडा दीड इंच, पणजी सव्वा इंच, वाळपई सव्वा इंच, सांगे, म्हापसा, मुरगाव, दाबोळी, पेडणे, सांखळी, काणकोण व जुने गोवे येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या 24 तासात सरासरी एक इंच पाऊस पडला व यंदाच्या मोसमातील पाऊस आता 122 इंच झालेला आहे.
गोव्यात पुढील चार दिवस सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. चारही दिवसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.