महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात सोमवारी दमदार सरी

11:24 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जनजीवन विस्कळीत, काही रस्त्यांवर साचले पाणी

Advertisement

बेळगाव : सोमवारी शहरासह उपनगरामध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. अचानकपणे दमदार सरी कोसळल्याने साऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. त्यामधून वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागली. रविवारपासूनच पावसाच्या अधूनमधून दमदार सरी कोसळत होत्या. सोमवारीही दुपारीच पावसाचे आगमन झाले. अचानकपणे शहराच्या विविध भागात पाऊस पडू लागला. त्यामुळे साऱ्यांनाच आडोसा शोधावा लागला. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविव्रेत्यांची तारांबळ उडाली. शहरातील रस्त्यांवर पाणी साचून होते. त्यामधून वाहने चालविताना खड्ड्यांमधील पाणी इतर वाहनांवर उडत होते. पावसामुळे बाजारपेठेतही दलदल झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना हातामध्ये छत्री किंवा रेनकोटचा आधार घ्यावा लागत होता. हा पाऊस काही पिकांना पोषक ठरला आहे. मात्र काही पिकांना मारक असल्याच्याही प्रतिक्रिया उमटल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article