For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तरी तालुक्यात मुसळधार पाऊस

03:11 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्तरी तालुक्यात मुसळधार पाऊस
Advertisement

वादळी वाऱ्याचा फटका, वीज वाहिन्या तुटल्या, होंडा येथे झाड पडल्यामुळे ट्रक व कारचे नुकसान

Advertisement

वाळपई : सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात गुऊवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संध्याकाळी वादळी वाऱ्याचा फटका बसल्यामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझडी झाल्या. वीज वाहिन्यांच्या तारा तुटल्या. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. संध्याकाळी 7 वा.च्या सुमारास वडाकडे, होंडा येथे आंब्याचे झाड ट्रक व कार गाडीवर पडल्यामुळे नुकसानी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सत्तरीतील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस लागत असल्यामुळे दोन दिवसांत सर्व नद्या प्रवाहित होण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी पडलेल्या झाडामुळे अग्निशामक दलाची दमछाक सुरू झालेली आहे. सत्तरी तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाने जोरदार सलामी दिली. अनेक भागाला झोडपून काढले. संध्याकाळी 7 वाजता सुमारास वादळीवाऱ्याचा फटका बसला.

यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे.वाळपई होंडा दरम्यानच्या रेडी घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन टप्प्याटप्प्याने रस्ता मोकळा करण्यावर भर दिला. होंडा वडाकडे पार्क करून ठेवलेल्या ट्रक व चार चाकी वाहनावर आंब्याचे झाड पडल्यामुळे नुकसानी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रक रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवला होता. चालक दुकानावर सामान घेण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आंब्याचे झाड ट्रकवर पडले. त्याचप्रमाणे बाजूलाच पार्क केलेल्या चारचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली.

Advertisement

वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित

वाळपईतील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा ठप्प झालेला आहे. तालुक्यातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्व पदावर आलेला नव्हता. होंडा येथे मध्यवर्ती रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहने मोठ्या प्रमाणात अडकून पडली होती. वाळपईतून सांखळीकडे जाणारी व सांखळीतून वाळपईकडे येणारी वाहने अडकली. मुसळधार पाऊस व दुसऱ्या बाजूने वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार अनेकांसाठी त्रासदायक ठरला.

आपत्कालीन व्यवस्थापन मजबूत करा

पावसाळी मौसमातील आज पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तसेच वादळी वाऱ्याचा फटका बसला. वाळपई होंडा मार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. यामुळे अग्निशामक दलावर मोठा ताण आला आहे. होंडा येथे पडलेले झाड बाजूला करण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल दीड तास लागला. आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत जेसीबी मशिनची व्यवस्था करण्यात आली असती तर अवघ्या अर्ध्या तासात रस्ता मोकळा झाला असता.त्यामुळे जेसीबी मशीनची व्यवस्था करा व आपत्कालीन व्यवस्थापन मजबूत करा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे.

Advertisement
Tags :

.