महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राकसकोप जलाशय परिसरात जोरदार पाऊस

11:53 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बुधवारी सायंकाळपर्यंत पाणीपातळीत तब्बल पावणे तीन फुटाने वाढ 

Advertisement

वार्ताहर /तुडये 

Advertisement

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसभरही पावसाचा जोर कायम राहिल्याने बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल पावणे तीन फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2454.60 फूट इतकी नोंद झाली होती. तर सायंकाळी 6 वाजता ही पाणीपातळी 2456.10 फुटावर आली होती. मंगळवारी सकाळपासून बुधवार सकाळपर्यंत सव्वा फूट वाढ झाली तर बुधवारी दिवसभरात दीड फूट पाणीपातळीत वाढ झाली. बुधवारी सकाळी 65.4 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षाचा एकूण 519.4 मि.मी. पाऊस झाला आहे.

जलाशयाला मिळणाऱ्या मार्कंडेय नदी पात्रात सर्वात जास्त पाणी प्रवाह असणारा जांभूळ ओहळ नाल्यासह अन्य नाले प्रवाहीत झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. मागीलवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने डेडस्टॉकमधील पाणीपुरवठा सुरू होता. मागीलवर्षी याच दिवशी जलाशय पाणीपातळी ही 2447.10 फूट इतकी होती. मागील वर्षापेक्षा 9 फूट पाणीसाठा जलाशयात जादा आहे. जलाशयाची 2465 फुटापर्यंतची पाणीपातळी ही कमी असल्याने लवकर पूर्ण होते. मात्र त्यानंतरची 2475 फुटापर्यंतची पाणीपातळी विस्तारलेली असल्याने पूर्ण होण्यास वेळ लागतो.

जलाशय परिसरातील पाऊस आणि पाणीपातळीत झालेली वाढ (सकाळी 8 पर्यंत)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article