For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालमधील ‘त्या’ घटनेचा निषेध

06:30 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालमधील ‘त्या’ घटनेचा निषेध
Advertisement

विविध महिला संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Advertisement

प्रतिनिधी/बेळगाव

पश्चिम बंगाल येथील दोन घटनांमध्ये महिलांना भररस्त्यात मारबडव करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून अमानुषरित्या महिलांवर झालेल्या अन्यायाची दखल सरकारने त्वरित घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील उन्नती ट्रस्ट व इतर महिला संघटनांकडून कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला.

Advertisement

पश्चिम बंगाल येथील कोच बेहार व उत्तर दिनाजपूर या ठिकाणी महिलांना अमानुषरित्या मारहाण करून अन्याय करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये महिलांवर हल्ले होण्याच्या घटनांत वाढ झाली असून महिलांचे शोषण केले जात आहे. ही अत्यंत खंडणीय बाब आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी महिला असतानाही या राज्यामध्ये महिलांचे संरक्षण होत नसल्याबद्दल याचा तीव्र निषेध करण्यात आला. भररस्त्यात मारहाण केली जात असताना संरक्षणासाठी कोणीच पुढे आले नाही. हा संपूर्ण महिलांचा अपमान आहे. हा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारने सदर घटनेची गांभीर्यान देखल घेऊन याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अलका इनामदार, डॉ. सोनाली सरनोबत, विद्या जोशी, उन्नती ट्रस्ट, लघु उद्योग भारती, चन्नम्मानगर मंडळ, राष्ट्र सेविका समिती, हिंदू राष्ट्र जनजागृती आदी विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

Advertisement
Tags :

.