महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड-बिडी भागात मुसळधार पाऊस

10:45 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नंदगड : नंदगड, बिडी, हलशी, बेकवाड भागात शुक्रवारी तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या एकाच आठवड्यात मंगळवारी, गुरुवारी व शुक्रवारी असा तीन दिवस पाऊस झाला. या पावसामुळे पेरणी केलेल्या भात पिकांत पाणी थांबून राहिल्याने भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्ग शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. नंदगड गावातील कौलारु घरातून मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी गळती निर्माण होऊन घरातून पाणी आले आहे. हे पाणी घराबाहेर काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ होत आहे.

Advertisement

बिडी येथेही पाऊस

Advertisement

हलशी, बेकवाड, बिडी व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शाळा सुटण्याच्या दरम्यान पाऊस आल्याने शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. गावोगावच्या गटारीतून पावसाचे पाणी पार न झाल्याने पाणी रस्त्यावर आले. रस्त्यालाही नदीचे स्वरुप निर्माण झाले होते. खानापूर-तालगुप्पा रस्त्यावर तब्बल दोन फूट पाणी वाहू लागल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्यांना व वाहनधारकांना मोठी समस्या निर्माण झाली होती. शेताला गेलेल्या लोकांना पाण्यातून वाहून जावू नये म्हणून घरातील अन्य लोकांनी सुरक्षित घरी आणण्यासाठी सहकार्य केले.

मातीचे रस्ते गेले वाहून

नंदगड भागातील ग्रामीण परिसरात शेताला जाण्यासाठी खडी व मातीचे रस्ते आहेत. हे रस्ते उन्हाळ्यात चांगले वाटले तरी आजच्या पावसामुळे मातीचे रस्ते वाहून गेले आहेत. पावसामुळे नाले प्रवाहित झाले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article