For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजांच्या कडकडाटांसह बाळेकुंद्री भागात जोरदार पाऊस

10:36 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजांच्या कडकडाटांसह बाळेकुंद्री भागात जोरदार पाऊस
Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

बाळेकुंद्री व परिसरातील मोदगा, सुळेभावी, मारिहाळ, हुदली व हन्नीकेरी भागात सोमवारी रात्री 8 च्या सुमारास दोन तासाहून अधिक विजेचा कडकडाटांसह वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने परिणामी  शिवारात या पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. विजेचा कडकडाटांसह वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्याने शिवारातील भाजीपाला पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला व पेरणीपूर्वी मशागतीला हा पाऊस उपयुक्त होणार आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास वळिवाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, टोमॅटो, वांगी, मिरची, मेथी, भेंडीसह मारिहाळ, सुळेभावी येथील आंबा बागायतदारांच्या झाडांच्या फांद्या पडून नुकसान झाल्या आहेत. वाऱ्याच्या तडाख्याने तुम्मरगुद्दी, हुदली येथील अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत.

अनेक पिकांत पाणी साचले

Advertisement

मुसळधार पडलेल्या पावसामुळे प्रामुख्याने कोथिंबीर फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, मिरची, मेथी, भेंडी व विविध प्रकारच्या पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. करडीगुद्दी, मारिहाळ, मोदगा, बाळेकुंद्री, सुळेभावी गावातील कांही काळ जोरदार वादळी वारा व पावसामुळे जनजीवनच विस्कळीत झाले होते. तसेच अनेकांची तारांबळ उडाली.

Advertisement
Tags :

.